Akhilesh Yadav On Aparna Yadav : अपर्णा यादव यांच्या भाजप प्रवेशानंतर अखिलेश यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 02:56 PM2022-01-19T14:56:12+5:302022-01-19T14:58:32+5:30
माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यांची धाकटी सून अपर्णा यादव यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. अपर्णा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या बरोबर आधीच समाजवादी पार्टीचे संरक्षक आणि माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यांची धाकटी सून अपर्णा यादव यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. अपर्णा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अखिलेश म्हणाले, सर्वप्रथम मी त्यांचे अभिनंदन करतो. नेताजींनी (मुलायमसिंह यादव) त्यांना समजवण्याचा बराच प्रयत्न केला होता.
समाजवादी विचारधारेचा विस्तार होत आहे, याचा आनंद -
अखिलेश यादव म्हणाले, "अपर्णा जी भाजपमध्ये गेल्याने आपल्याला सर्वाधिक आनंद झाला आहे. कारण, समाजवादी विचारसरणीचा विस्तार होत आहे. मला आशा आहे की, आमची विचारधारा तेथेही पोहोचेल आणि संविधान व लोकशाही वाचवण्याचे काम करेल. नेताजींनी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला." अखिलेश पत्रकार परिषदेत बोलत होते.
काय म्हणाले, योगी आदित्यनाथ?
अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सीएम योगी ट्विट करत म्हणाले, "अपर्णाजींचे भाजप परिवारात स्वागत आहे." आज अपर्णा यादव यांनी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी, मी सुरुवातीपासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यामुळे प्रभावित आहे, असे त्या म्हणाल्या. तसेच, अपर्णा यादव यांचा कल नेहमीच भाजपकडे राहिला आहे. त्यांनी अनेक वेळा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचीही जाहीरपणे स्तुती केली आहे.