निवडणुकीच्या तोंडावर यूपीमध्ये भाजपाला जबर धक्का, स्वामी प्रसाद मौर्य यांनी पदाचा राजीनामा देत केला सपामध्ये प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 04:18 PM2022-01-11T16:18:50+5:302022-01-11T16:19:50+5:30
Uttar Pradesh Assembly Election 2022: उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला जबर धक्का बसला आहे. योगी सरकारमधील बलाढ्य मंत्री Swami Prasad Maurya यांनी पदासोबत भाजपाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.
लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला जबर धक्का बसला आहे. योगी सरकारमधील बलाढ्य मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी पदासोबत भाजपाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांनी २०१७ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला होता. ते पडरौना मतदारसंघातून निवडून आले होते. ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले होते.
स्वामी प्रसाद मौर्य यांनी तडकाफडकी भाजपाला रामराम ठोकल्यानंतर अखिलेश यादव यांची भेट घेच समाजवादी पक्षात प्रवेश केला. त्यानंतर या पक्षप्रवेशाची अखिलेश यादव यांनी ट्विट करत माहिती दिली. त्यात अखिलेश यादव म्हणाले की सामाजिक न्याय आणि समता-समानतेची लढाई लढणारे लोकप्रिय नेते स्वामी प्रसाद मौर्य आणि त्यांच्यासोबत आलेल्या अन्य सर्व नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे समाजवादी पक्षामध्ये स्वागत आहे. उत्तर प्रदेशात सामाजित न्यायामध्ये इन्कलाब होईल, २०२२ मध्ये परिवर्तन होईल.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयुषमंत्री धर्मसिंह सैनी यांच्यासह ४ आमदार समाजवादी पक्षामध्ये जाऊ शकतात. भाजपाला अजून मोठे धक्के बसण्याची शक्यता असून, मंत्री दारा सिंह चौहान हेसुद्धा भाजपाला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर कानपूर ग्रामीणमधील भाजपा आमदार भगवती प्रसाद सागर हे सुद्धा स्वामी प्रसाद मौर्य यांच्या निवासस्थानी दिसले होते. त्यांच्याबरोबरच भाजपा आमदार रोशन लाल वर्मा हेसुद्धा सपामध्ये जाण्याची शक्यता आहे.