Uttar Pradesh Assembly Election: राजनाथसिंहांचे पुत्र पंकजसिंह यांच्या संपत्तीत दुप्पट वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 06:29 AM2022-01-22T06:29:41+5:302022-01-22T06:30:04+5:30

नाेयडातून आमदार, काेणतेही गुन्हे नाहीत

Uttar Pradesh Assembly Election Rajnath Singhs son Pankaj Singhs wealth doubled | Uttar Pradesh Assembly Election: राजनाथसिंहांचे पुत्र पंकजसिंह यांच्या संपत्तीत दुप्पट वाढ

Uttar Pradesh Assembly Election: राजनाथसिंहांचे पुत्र पंकजसिंह यांच्या संपत्तीत दुप्पट वाढ

googlenewsNext

नाेयडा : गाैतम बुद्धनगच्या तीन विधानसभा मतदारसंघांतील विद्यमान आमदारांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविराेधात काेणतेही गुन्हे दाखल नसल्याची माहिती तिघांनीही उमेदवारी अर्जसाेबत दाखल केलेल्या शपथपत्रातून दिली आहे. नाेयडा, दादरी आणि जेवर या ठिकाणी अनुक्रमे पंकजसिंह, धीरेंद्रसिंह आणि तेजपाल नागर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. पंकजसिंह हे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचे पुत्र आहेत. त्यांनी ३ लाख ७८ हजार १४० रुपये वार्षिक उत्पन्न असल्याचे सांगितले आहे. त्यांच्याकडे काेणतीही स्थावर मालमत्ता नाही. मात्र, त्यांच्या पत्नीकडे २ काेटी ३३ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. याशिवाय पंकजसिंह यांच्याकडे २०१७ मध्ये ४७ लाख रुपयांची चल संपत्ती हाेती. त्याचे मूल्य सध्या १.२४ काेटी रुपये आहे. 
धीरेंद्रसिंह यांचे वार्षिक उत्पन्न ६.७५ लाख रुपये आहे. तसेच त्यांच्या नावावर २ काेटी ७८ लाख रुपये तर पत्नीच्या नावे २२ लाख रुपयांची चल संपत्ती आहे. त्यांच्याकडील स्थावर मालमत्तेचे मूल्य ७ काेटी आहे.

Web Title: Uttar Pradesh Assembly Election Rajnath Singhs son Pankaj Singhs wealth doubled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.