Uttar Pradesh Assembly Election Results 2022 : पंकज सिंह यांचा मोठ्या मताधिक्याने विजय, विधानसभा निवडणुकीत बनवला रेकॉर्ड!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 04:14 PM2022-03-10T16:14:03+5:302022-03-10T16:15:43+5:30

Pankaj Singh : नोएडा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार पंकज सिंह यांना 70.83 टक्के मते मिळाली आहेत.

Uttar Pradesh Assembly Election Results 2022 : pankaj singh makes a new record in indian politics wins noida assembly | Uttar Pradesh Assembly Election Results 2022 : पंकज सिंह यांचा मोठ्या मताधिक्याने विजय, विधानसभा निवडणुकीत बनवला रेकॉर्ड!

Uttar Pradesh Assembly Election Results 2022 : पंकज सिंह यांचा मोठ्या मताधिक्याने विजय, विधानसभा निवडणुकीत बनवला रेकॉर्ड!

googlenewsNext

नोएडा : भारतीय जनता पार्टीचे (BJP) उमेदवार पंकज सिंह (Pankaj Singh) यांनी उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील नोएडा विधानसभा जागा सुमारे 1 लाख 80 हजारांच्या विक्रमी फरकाने जिंकली आहे. विधानसभा निवडणुकीत हा सर्वात मोठा विजय आहे.

नोएडा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार पंकज सिंह यांना 70.83 टक्के मते मिळाली आहेत. त्या तुलनेत समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला केवळ 16.84 टक्के, बसपाच्या उमेदवाराला 5.01 आणि काँग्रेसच्या उमेदवाराला 3.97 टक्के मते मिळाली आहेत.

नोएडा विधानसभा मतदारसंघात भाजपचे पंकज सिंह यांच्यासमोर समाजवादी पक्षाचे उमेदवार सुनील चौधरी, बसपचे कृपाराम शर्मा आणि काँग्रेसचे पंखुरी पाठक यांच्यात लढत होती. उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील नोएडा विधानसभा जागा राजकीयदृष्ट्या प्रभावशाली जागा असल्याचे म्हटले जाते. 

पंकज सिंह हे  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे पुत्र
दरम्यान, दिल्लीला लागून असलेली ही जागा सध्या भाजपाच्या ताब्यात असून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे पुत्र पंकज सिंह हे आमदार आहेत. 2017 मध्ये निवडून आलेले पंकज सिंह यांना या जागेवरून एकूण 1 लाख 62 हजार 417 मते मिळाली होती. या निवडणुकीत सपाचे सुनील चौधरी होते, त्यांना 58 हजार 401 मते मिळाली होती. 2012 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाचे डॉ. महेश शर्मा यांनी ही जागा जिंकली होती. महेश शर्मा या जागेवर दोन वर्षे आमदार होते.

Web Title: Uttar Pradesh Assembly Election Results 2022 : pankaj singh makes a new record in indian politics wins noida assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.