UP Election : जनतेची माफी मागत भाजप आमदारानं व्यासपीठावरच घातल्या उठाबशा; पाहा - VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 05:03 PM2022-02-23T17:03:25+5:302022-02-23T17:05:19+5:30
रॉबर्टसगंज मुख्यालय येथे बुधवारी भाजपची जाहीर सभा झाली. रॉबर्टसगंज विधानसभेतील भाजपचे आमदार भूपेश चौबे हेही जाहीर सभेत होते. यावेळी त्यांना जनतेची नाराजी दूर करण्यासाठी अनोखा मार्ग अवलंबला.
सध्या उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे वातावरण जबरदस्त तापले आहे. या निवडणुकीदरम्यान अनेक चित्र-विचित्र घटनाही बघायला मिळत आहेत. सोनभद्रच्या रॉबर्टसगंज विधानसभा मतदार संघातील भाजप आमदार भूपेश चौबे यांनी जनतेची नाराजी दूर करण्यासाठी बुधवारी जाहीर सभेत हात जोडून माफी तर मागीतलीच, पण खुर्चीवर उभे राहून कान धरत उठाबशाही मारल्या. या प्रसंगाचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.
रॉबर्टसगंज मुख्यालय येथे बुधवारी भाजपची जाहीर सभा झाली. रॉबर्टसगंज विधानसभेतील भाजपचे आमदार भूपेश चौबे हेही जाहीर सभेत होते. यावेळी त्यांना जनतेची नाराजी दूर करण्यासाठी अनोखा मार्ग अवलंबला. ते व्यासपीठावर ठेवलेल्या खुर्चीवर उभे राहिले. मग हात जोडून माफी मागितली. यानंतर कान पकडून उठाबशाही घातल्या.
रॉबर्टसगंज से भाजपा के विधायक भूपेश चौबे ने कान पकड़ कर उठक बैठक की ताकि जनता उनके पांच साल के कुशासन को भुला दे ।
— Chhattisgarh Pradesh Congress Sevadal (@SevadalCG) February 23, 2022
लोकतंत्र में जनता से ज्यादा ताकतवर कोई नही है । 😀 pic.twitter.com/2GDxew3HvN
यावेळी आमदारांनी आपल्याकडून झालेली चूक आता होणार नाही, अशी ग्वाही जनतेला दिली. स्थानिक जनतेमध्ये आमदाराविरोधात प्रचंड नाराजी असल्याचे समजते. आमदार भूपेश चौबे यांनी आपल्या कार्यकाळात या भागाचा एकही विकास काम केले नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी आमदार भूपेश चौबे जाहीर माफी मागत आहेत.