Video - योगी आदित्यनाथांच्या विजयासाठी खास 'मिरची यज्ञ'; तब्बल १ क्विंटल मिरच्यांचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 12:59 PM2022-03-10T12:59:13+5:302022-03-10T13:08:54+5:30

Uttar Pradesh Assembly Elections 2022 Result Ani Yogi Adityanath : मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये भाजपा आणि योगींच्या विजयासाठी विशेष यज्ञ आयोजित करण्यात आला होता. मतमोजणी सुरू होण्यापूर्वी हा यज्ञ करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Uttar Pradesh Assembly Elections 2022 Result Mirchi Yagya BJP Victory Leaders Voting Yogi Adityanath | Video - योगी आदित्यनाथांच्या विजयासाठी खास 'मिरची यज्ञ'; तब्बल १ क्विंटल मिरच्यांचा वापर

Video - योगी आदित्यनाथांच्या विजयासाठी खास 'मिरची यज्ञ'; तब्बल १ क्विंटल मिरच्यांचा वापर

Next

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणीला सुरुवात झाली असून, आता जवळपास तीन तासांनंतर ४०१ जागांचे कल हाती आले आहेत. यामध्ये भाजप २६९ जागांसह आघाडीवर आहे. तर सपा १२१ जागा, बसप ०५, काँग्रेस ०३ आणि अन्य ३ वर आघाडीवर आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या गोरखपूर शहर विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत. आत्तापर्यंत योगी आदित्यनाथ १६ हजार ५६९, समाजवादी पक्षाच्या सुभाती शुक्लांना ४ हजार २९०, काँग्रेसच्या चेतना पांडे २२६ मते, बसपचे ख्वाजा शमसुद्दीन यांना १०४२ मते मिळाली आहेत. भाजपाची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं, आनंदाचं वातावरण आहे. 

मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये भाजपा आणि योगींच्या विजयासाठी विशेष यज्ञ आयोजित करण्यात आला होता. मतमोजणी सुरू होण्यापूर्वी हा यज्ञ करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. शहरातील बागला मुखी धाम येथे रात्री १० ते ३ या वेळेत "मिरची यज्ञ" करण्यात आला. पीर रामनाथ महाराज देखील नाथ संप्रदायाचे आहेत आणि योगी आदित्यनाथ देखील नाथ संप्रदायातील आहेत. अशा परिस्थितीत यूपीचे मुख्यमंत्री योगी यांच्या विजयासाठी होमहवन सोहळा पार पडला. सर्वप्रथम योगी आदित्यनाथ यांच्या विजयाचा संकल्प घेऊन यज्ञ सुरू करण्यात आला. या यज्ञ कार्यक्रमात ११ पुरोहितांनी भाग घेतला होता. 

योगी आदित्यनाथ विजयी होऊन पुन्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा यावेळी व्यक्त करण्यात आली. या यज्ञात १ क्विंटल मिरची व इतर साहित्य वापरण्यात आलं आहे. या एका यज्ञासाठी जवळपास ४० ते ५० हजार रुपये खर्च आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्येतील एकूण ५ जागांपैकी भाजप चार जागांवर आघाडीवर आहे, तर सपा एका जागेवर आघाडीवर आहे. अयोध्येच्या गोसाईगंज विधानसभा मतदारसंघातून सपा उमेदवार अभय सिंह २६०० मतांनी आघाडीवर असून भाजपच्या उमेदवार आरती तिवारी मागे आहेत.

Web Title: Uttar Pradesh Assembly Elections 2022 Result Mirchi Yagya BJP Victory Leaders Voting Yogi Adityanath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.