Yogi Adityanath, Uttar Pradesh Assembly elections Result 2022: ना सायकल, ना हत्ती, ना हात.. उत्तर प्रदेशच्या जनतेची योगी आदित्यनाथ यांनाच साथ; BJP खासदार Ravi Kishan यांचा विरोधकांना सणसणीत टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 13:01 IST2022-03-10T12:58:11+5:302022-03-10T13:01:02+5:30
यूपीच्या जनतेनं रामराज्याची निवड केली, असंही रवि किशन म्हणाले.

Yogi Adityanath, Uttar Pradesh Assembly elections Result 2022: ना सायकल, ना हत्ती, ना हात.. उत्तर प्रदेशच्या जनतेची योगी आदित्यनाथ यांनाच साथ; BJP खासदार Ravi Kishan यांचा विरोधकांना सणसणीत टोला
Uttar Pradesh Assembly elections Result 2022: उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने (BJP) धडाकेबाज विजयाच्या दिशेने आगेकूच केली. सकाळी मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या चार तासांतच चित्र जवळपास स्पष्ट झालं. भाजपाने ४०३ पैकी २५०+ जागांवर आघाडी मिळवली. भाजपाच्या विजयाचं चित्र स्पष्ट होताच नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली. यूपीच्या जनतेने रामराज्याची निवड केली असं मत खासदार रवि किशन (Ravi Kishan) यांनी व्यक्त केलं.
उत्तर प्रदेश की जनता ने सोच लिया कि राम राज्य लाना है और राम राज्य की शुरूआत हो गई है। एक नया उत्तर प्रदेश, एक नया भारत उस दिशा में प्रदेश की जनता ने भविष्य चुना है: गोरखपुर से भाजपा सांसद रवि किशन, गोरखपुर, उत्तर प्रदेश #ElectionResultspic.twitter.com/ZHONWfJH4u
— ANI_HindiNews (@AHindinews) March 10, 2022
"उत्तर प्रदेशच्या जनतेने मनात पक्क केलं होतं की यूपीमध्ये रामराज्य आणायचं. रामराज्य साकारण्याची सुरूवात यूपीच्या जनतेने केली आहे. नवं उत्तर प्रदेश आणि नवीन भारताच्या दिशेने आगेकूच करण्याच्या उद्देशाने यूपीच्या जनतेने त्यांचं भविष्य निवडलं आहे. आता अखिलेश यादव आणि त्यांचे मित्रपक्षांना कोणत्या गोष्टीचा घमंड असेल? कारण त्यांचा मोठा पराभव झालाय. विरोधकांना मी सांगू इच्छितो की ना सायकल, ना हत्ती, ना हात... उत्तर प्रदेशच्या जनतेची योगींनाच साथ", अशा शब्दात गोरखपूर मतदारसंघातील भाजपाचे खासदार रवि किशन यांनी आनंद व्यक्त केला. (Uttar Pradesh Assembly Election 2022)
#WATCH उत्तर प्रदेश: विपक्ष के लिए कहना चाहूंगा, "ना साइकिल, ना हाथी, ना हाथ बा...उत्तर प्रदेश में योगी आदित्यनाथ बा: गोरखपुर से भाजपा सांसद रवि किशन, गोरखपुर, उत्तर प्रदेश #ElectionResultspic.twitter.com/EKGkKXugR1
— ANI_HindiNews (@AHindinews) March 10, 2022
उत्तर प्रदेशात सर्व ४०३ जागांचे कल हाती आले. भाजपने २६९ जागांवर मोठी आघाडी घेतली. तर सपा १२३ जागा, बसपा ०५, काँग्रेस ०३ आणि अन्य ३ वर आघाडीवर असल्याचं दिसलं. दुपारी १ वाजेपर्यंत गांधी कुटुंबियांचा पारंपरिक मतदारसंघ मानल्या जाणाऱ्या रायबरेली येथे काँग्रेस उमेदवाराला तिसऱ्या स्थानी समाधान मानावं लागलं. तसेच, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या गोरखपूर शहर विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर राहिले. दुपारी १ वाजेपर्यंत योगी आदित्यनाथ १६ हजार ५६९, समाजवादी पक्षाच्या सुभाती शुक्लांना ४ हजार २९०, काँग्रेसच्या चेतना पांडे २२६ मते, बसपचे ख्वाजा शमसुद्दीन यांना १०४२ मते मिळाली होती.