उत्तर प्रदेश विधानसभेत स्फोटकं आढळल्याने खळबळ
By admin | Published: July 14, 2017 10:59 AM2017-07-14T10:59:56+5:302017-07-14T12:33:49+5:30
उत्तर प्रदेश विधानसभेत सत्र चालू असताना स्फोटकं आढळल्याचं प्रकरण समोर आलं आहे
Next
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 14- उत्तर प्रदेश विधानसभेत सत्र चालू असताना स्फोटकं आढळल्याचं प्रकरण समोर आलं आहे. ही घटना समोर आल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी सकाळी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. गुरूवारी विधानसभेच सत्र चालू असताना पांढऱ्या रंगाची संशयास्पद पावडर आढळून आली होती. यामुळे विधानसभेत एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
Lucknow (UP): 60 grams of suspicious white powder found in UP assembly during ongoing session yesterday, sent to forensic lab for testing
— ANI UP (@ANINewsUP) July 14, 2017
विधानसभेत विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीपासून काही अंतरावर ही पांढऱ्या रंगाची पावडर सापडल. 150 ग्रॅम वजन असणाऱ्या पावडरला तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आलं होतं. गुरूवारी संध्याकाळी फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टने ही पावडर पीईटीएन नावाचं स्फोटक असल्याचा खुलासा केला आहे.
आणखी वाचा
AIB पुन्हा वादात; मोदींच्या फोटोची उडवली खिल्ली
कुलभूषण जाधव यांच्या आईला पाक देणार व्हिसा?
गंगेच्या परिसरात बांधकामांना बंदी
विधानसभेच्या बाहेर कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही स्फोटकं आत आली कशी? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. सदनात स्फोटक आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर डॉग स्क्वॉडकडून संपूर्ण विधानसभा क्षेत्राची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर रात्री 12 वाजता विधानसभा क्षेत्र बंद करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेशी निगडीत काही जणांना विधानसभेच्या आत स्फोटक पदार्थ असल्याचं समजलं होतं. यासंबंधी त्यांनी योगी आदित्यनाथ यांना माहिती दिली होती.
या प्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी डीजीपी, मुख्य सचिव, विधान सभा सचिव यांच्यासह सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून विधानसभा आणि सचिवालयाच्या सुरक्षेबद्दल बेजबाबदारीसाठी चांगलंच फटकारल्याचीही माहिती मिळते आहे.
दरम्यान, दिल्ली संसद भवन परिसरात सुरक्षेचा आढावा घेतला जातो आहे. उत्तर प्रदेश विधानसभेत स्फोटकं मिळाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून संसद भवन परिसरातील सुरक्षेची चाचपणी केली जाते आहे.
दरम्यान,