अयोध्येतील पराभव बोचणारा...! मक्का आणि व्हॅटिकनचं उदाहरण देत सुधांशू त्रिवेदी स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 09:27 AM2024-06-07T09:27:36+5:302024-06-07T09:29:14+5:30
सुधांशु त्रिवेदी यांना या पराभावासंदर्भात विचारले असाता, ते म्हणाले, अयोध्येतील पराभव हा भावनिक दृष्या अत्यंत बोचणार पराभव आहे.
या लोकसभा निवडणुकीतील अयोध्येतील पराभव हा भाजपसाठी सर्वात मोठा धक्का आहे. निवडणुकीत राम मंदिरही एक मोठा मुद्दा होता. यामुळे अयोध्येची जागा भाजपच्याच खात्यात जाणार असे मानले जात होते. मात्र झाले उलटे, येथे भाजपचा धक्कादायक पराभव झाला. यासंदर्भात भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी भाष्य केले आहे.
सुधांशु त्रिवेदी यांना या पराभावासंदर्भात विचारले असाता, ते म्हणाले, अयोध्येतील पराभव हा भावनिक दृष्या अत्यंत बोचणार पराभव आहे. तसेच, रोशोचा विचार करता अयोध्येत जेवढा विकास झाला, तेवढा इतर कुठल्याही शहरात झाला नाही. कदाचित हेच कारण आहे की, राम मंदिर होण्यासाठी 500 वर्ष लागले.
दिलं मक्का आणि व्हॅटिकनचं उदाहरण -
सुधांशू म्हणाले, इस्लाम धर्मावर टीका करणारा पक्ष मक्केमध्ये निवडणूक जिंकू शकेल अथवा ख्रिश्चन धर्मावर टीका करणारा पक्ष व्हॅटिकनमध्ये निवडणूक जिंकू शकेल, असे कुठलेही उदारण आपल्याला जगात दिसणार नाही. सुधांशू त्रिवेदी न्यूज 18 इंडियावरील डिबेटदरम्यान बोलत होते.
महिलांची फसवणूक
सुधांशू त्रिवेदी काँग्रेसच्या खटाखट खटाखट वाल्या विधानावर बोलताना म्हणाले, भलेही केंद्रात नसेल, पण राज्यात तर काँग्रेसचे सरकार आहे. किमान तेथील लोकांना तरी 8-8 हजार रुपये द्या. एवढेच नाही, तर लखनौमध्ये काँग्रेस कार्यालयावर पोहोचलेल्या महिलांसंदर्भात बोलताना ते म्हणाले, त्यांच्यासोबत धोका झाला आहे. त्यांची फसवणूक झाल्यासारखे वाटत आहे, असेही सुधांशू म्हणाले.