वीज कर्मचाऱ्याला दंड ठोठावणं पोलिसांना महागात; पोलीस ठाण्याचंच कनेक्शन कापून टाकलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 07:04 PM2022-03-30T19:04:22+5:302022-03-30T19:04:54+5:30

उत्तर प्रदेशातील बदायूंमध्ये एक विचित्र प्रकार घडला आहे. यूपी पॉवर कॉर्पोरेशनमध्ये (UPPCL) लाइनमनचं काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला दुचाकीवरुन जाताना यूपी पोलिसांनी अडवलं आणि त्याला दंड ठोठावला.

uttar pradesh badaun uppcl lineman cuts electricity connection of police station after being facing challan | वीज कर्मचाऱ्याला दंड ठोठावणं पोलिसांना महागात; पोलीस ठाण्याचंच कनेक्शन कापून टाकलं!

वीज कर्मचाऱ्याला दंड ठोठावणं पोलिसांना महागात; पोलीस ठाण्याचंच कनेक्शन कापून टाकलं!

Next

उत्तर प्रदेशातील बदायूंमध्ये एक विचित्र प्रकार घडला आहे. यूपी पॉवर कॉर्पोरेशनमध्ये (UPPCL) लाइनमनचं काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला दुचाकीवरुन जाताना यूपी पोलिसांनी अडवलं आणि त्याला दंड ठोठावला. हा प्रकार लाइनमनच्या सहकाऱ्यांना लक्षात येताच त्यांनी थेट पोलीस ठाण्याची वीजच कापून टाकली. वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्याशी निगडीत सुमारे १२ बेकायदेशीर वीज कनेक्शन कापण्याची कारवाई केली आहे. त्यामुळे एका वीज कर्मचाऱ्यावर कारवाई केल्यामुळे पोलीस ठाणं अंधारात गेल्याची वेळ उत्तर प्रदेश पोलिसांवर आली आहे. 

नेमकं प्रकरण काय?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, घटना सोमवार 28 मार्चची आहे. कुंवरगाव वीज उपकेंद्राचा लाइनमन अजय हा काली गावात वीज कनेक्शन जोडण्यासाठी गेला होता. लाइन जोडून अजय दुपारी दुचाकीवर परत येत होता. त्याच्याकडे हेल्मेट नव्हतं. काझी गावाच्या वळणावर कुंवरगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामनरेश वाहनांची तपासणी करत होते. हेल्मेटशिवाय दुचाकी चालवल्याबद्दल त्यांनी अजयला थांबवलं. आपण पॉवर कॉर्पोरेशनचा लाईनमन असून तो कुंवरगाव पॉवर सबस्टेशनच्या ड्युटीवर असल्याचं अजयनं इन्स्पेक्टरला सांगितलं. पण निरीक्षकांनी त्याचं ऐकलं नाही आणि हेल्मेटशिवाय दुचाकी चालवल्याबद्दल त्याचं ऑनलाइन चलान कापलं.
 
वीज उपकेंद्रावर पोहोचल्यानंतर अजयनं त्याचे वरीष्ठ अधिकारी जेई सतीश चंद्रासह त्यांच्या उर्वरित सहकाऱ्यांना याबाबत सांगितलं. अजयला दंड ठोठावण्यात आल्यानं विद्युत विभागाचे कर्मचारी संतप्त झाले, सर्वांनी कुंवरगाव पोलीस ठाण्यातील वीज कनेक्शन तपासलं असता पोलीस ठाण्यात सुमारे डझनभर अवैध कनेक्शन असल्याचं आढळून आलं. मग काय, वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाणे गाठून पोलीस ठाण्याचे सर्व अवैध कनेक्शन तोडले. एवढंच नाही तर कर्मचाऱ्यांनी लाईन कापण्यापूर्वी व लाईन कापताना व्हिडिओ बनवून या सर्व व्हिडिओ क्लिप वीज विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठवल्या आहेत.

काय म्हणाले अधिकारी?
"निरीक्षक आणि लाइनमनमध्ये नेमकं काय झालं याची माहिती नाही, मात्र उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशनला लाइन आणि कनेक्शन कापल्याचं व्हिडिओ पाठवले आहेत", असं या प्रकरणी कुंवरगावचे एसडीओ विपीन मौर्य यांनी सांगितलं. "पोलीस ठाण्यात फक्त एक कनेक्शन वैध होतं जे खंडित करण्यात आलेलं नाही  इतर सर्व बेकायदेशीरपणे सुरू असलेली कनेक्शन तोडण्यात आली आहेत", अशी माहिती एसडीओ विपिन मौर्य यांनी दिली. 

Web Title: uttar pradesh badaun uppcl lineman cuts electricity connection of police station after being facing challan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.