स्कूटरवरुन जाणाऱ्या महिला शिक्षिकेला डम्परची धडक, ३ किमी फरफटत नेलं; डम्परला आग; जळून मृत्यू!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 10:11 PM2023-01-04T22:11:59+5:302023-01-04T22:13:59+5:30

दिल्लीत स्कूटीवरुन जाणाऱ्या २० वर्षीय तरुणीला कारनं धडक देत १२ किमी फरफटत नेल्याच्या घटनेनं संपूर्ण देश हादरलेला असताना उत्तर प्रदेशातही अशीच एक घटना समोर आली आहे.

uttar pradesh banda news woman died after truck dragged with scooty for 3km | स्कूटरवरुन जाणाऱ्या महिला शिक्षिकेला डम्परची धडक, ३ किमी फरफटत नेलं; डम्परला आग; जळून मृत्यू!

स्कूटरवरुन जाणाऱ्या महिला शिक्षिकेला डम्परची धडक, ३ किमी फरफटत नेलं; डम्परला आग; जळून मृत्यू!

googlenewsNext

दिल्लीत स्कूटीवरुन जाणाऱ्या २० वर्षीय तरुणीला कारनं धडक देत १२ किमी फरफटत नेल्याच्या घटनेनं संपूर्ण देश हादरलेला असताना उत्तर प्रदेशातही अशीच एक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशात बांदा येथे स्कूटीवरुन जाणाऱ्या महिला शिक्षकेचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार एका डम्परनं महिला शिक्षिकेच्या स्कूटरला धडक दिली. त्यानंतर तिला जवळपास ३ किमी फरफटत नेलं. स्कूटरही डम्परमध्येच अडकली होती. थोड्यावेळानं डम्परमध्ये आग लागली आणि स्कूटर चालवणाऱ्या महिलेचा जळून मृत्यू झाला. 

माहिती मिळताच घटनास्थली पोहोचलेल्या पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. यानंतर क्रेनच्या मदतीने डंपरमध्ये अडकलेल्या महिलेची स्कूटी आणि तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. दुसरीकडे घटनास्थळी स्थानिक नागरिकांची गर्दी झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला ही लखनौची रहिवासी आहे. पतीच्या निधनानंतर तिला कोट्यातून शिक्षिकेची नोकरी मिळाली. डंपर चालक घटनास्थळावरून फरार झाल्याचेही पोलिसांनी सांगितले. त्याचा शोध सुरू आहे. 

शॉर्ट सर्किटमुळे डम्परमध्ये आग
लखनौ येथील रहिवासी असलेल्या पुष्पा देवी या स्कूटरनं प्रवास करत असता एका डम्परनं जोरदार धडक दिली. या घटनेत स्कूटी डंपरच्या आत घुसली. अपघातामुळे स्कूटीस्वार महिला शिक्षिकेला डम्पर चालक तीन किलोमीटरपर्यंत फरफटत घेऊन गेला. दरम्यान, शॉर्टसर्किटमुळे डम्परनं पेट घेतला. या घटनेत स्कूटीस्वार महिलाही जळाली. माहिती मिळताच अग्निशमन दलासह पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. ट्रकमधून मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली. ही महिला बंडा कोणत्या कामासाठी गेली होती हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

काय आहे दिल्लीची कांजवाला घटना?
३१ डिसेंबरच्या रात्री अंजली या २० वर्षीय तरुणीला बलेनो कारने धडक दिली आणि कारमध्ये अडकल्यामुळे तब्बल १२ किलोमीटरपर्यंत फरफटत गेली. १ जानेवारी रोजी सकाळी पोलिसांना कांजवाला परिसरातील रस्त्यावर एका मुलीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही बाब समोर येताच पोलिसांनी २४ तासांत बलेनो कारमधील ५ जणांना अटक करून न्यायालयात हजर केले आणि तीन दिवसांची पोलीस कोठडी घेतली.

Web Title: uttar pradesh banda news woman died after truck dragged with scooty for 3km

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात