दुर्गापूजा मंडपात भीषण आग, 64 जण होरपळले, तिघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 07:51 AM2022-10-03T07:51:09+5:302022-10-03T08:01:02+5:30
bhadohi fire on navratri in durga puja pandal : आगीच्या घटनेमुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील भदोहीमध्ये (Bhadohi) नवरात्रीत (Navratra) रविवारी रात्री दुर्गापूजा (Durga Puja) मंडपात भीषण आग लागली. दुर्गापूजा मंडपात लागलेल्या आगीत जवळपास 64 जण होरपळले. तर तिघांचा मृत्यू झाल्याचे समजते. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना उपचारासाठी वाराणसी (Varanasi) आणि प्रयागराज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीच्या घटनेमुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.
दरम्यान, भदोही येथील दुर्गापूजा मंडपात आग लागल्याचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे म्हटले जात आहे. मंडपाला आग लागली तेव्हा जवळपास दीडशे लोक उपस्थित होते. आग एवढी भीषण होती की, त्यात 64 जण भाजले. याशिवाय तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, यावेळी 40 टक्क्यांहून अधिक लोक आगीत अडकले. यामध्ये बहुतांश लोक 30 ते 40 टक्के भाजले आहेत. तर काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
#UPDATE | Uttar Pradesh: The death toll has reached 3 in the Bhadohi #DurgaPuja pandal fire matter. A 12-year-old boy, a 10-year-old boy and a 45-year-old woman died: Bhadohi DM Gaurang Rathi
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 3, 2022
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या आगीच्या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तसेच, जखमींवर उपचार करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सीएमओने ट्विट करून ही माहिती दिली. सीएमओने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, "मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भदोही जिल्ह्यातील औरई येथील दुर्गा मंडपाला लागलेल्या आगीच्या घटनेची दखल घेतली आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून योग्य उपचार करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत."
#UPCM@myogiadityanath ने जनपद भदोही के औराई में दुर्गा पंडाल में आग लगने की घटना का संज्ञान लिया है।
— CM Office, GoUP (@CMOfficeUP) October 2, 2022
मुख्यमंत्री जी ने घायलों को तत्काल अस्पताल पहुंचाकर जिला प्रशासन के अधिकारियों को उनके समुचित उपचार के निर्देश दिए हैं।
पुढील ट्विटमध्ये सीएमओने लिहिले की, "मुख्यमंत्र्यांनी जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच, जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन मदतकार्य युद्धपातळीवर करण्याच्या सूचना दिल्या आहेत." दरम्यान, आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस याठिकाणी पोहोचले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.