केंद्राकडून उत्तर प्रदेश, बिहारला सर्वाधिक निधी, सर्व राज्यांना वाटले १.४ लाख कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 05:31 AM2024-06-12T05:31:02+5:302024-06-12T05:31:30+5:30

Central Government: सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) सरकारने कार्यभार स्वीकारला. त्यानंतर सरकारने लगेच निधीचे वितरण सुरू केले असून, राज्य सरकारांना जूनसाठी त्यांच्या करांतील हिश्श्यापोटी १,३९,७५० कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

Uttar Pradesh, Bihar received the most funds from the Centre, while all the states shared Rs 1.4 lakh crore | केंद्राकडून उत्तर प्रदेश, बिहारला सर्वाधिक निधी, सर्व राज्यांना वाटले १.४ लाख कोटी रुपये

केंद्राकडून उत्तर प्रदेश, बिहारला सर्वाधिक निधी, सर्व राज्यांना वाटले १.४ लाख कोटी रुपये

 नवी दिल्ली - सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) सरकारने कार्यभार स्वीकारला. त्यानंतर सरकारने लगेच निधीचे वितरण सुरू केले असून, राज्य सरकारांना जूनसाठी त्यांच्या करांतील हिश्श्यापोटी १,३९,७५० कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. सर्वाधिक २५,०६९.८८ कोटी रुपयांचा निधी उत्तर प्रदेशला देण्यात आला आहे. १४,०५६.१२ कोटी रुपयांच्या निधीसह बिहार दुसऱ्या स्थानी आहे. मध्य प्रदेशला १०,९७०.४४ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

केंद्रीय वित्त मंत्रालयाने अधिकृतरित्या याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. मार्चमध्ये सादर करण्यात आलेल्या हंगामी अर्थसंकल्पात २०२४-२५ या वित्त वर्षासाठी राज्यांचा केंद्रीय करातील वाटा १२,१९,७८३ कोटी रुपये ठरविण्यात आला होता. 

ताज्या वितरणानंतर आतापर्यंत २,७९,५०० कोटी रुपयांचा निधी राज्यांना वितरित करण्यात आला आहे. ज्या राज्यांमध्ये आगामी काळात निवडणुका होणार आहेत त्यांना जादा प्रमाणात निधी दिल्याचे दिसते. 

कोणाला किती निधी?
उत्तर प्रदेश     २५,०६९.८८
बिहार     १४,०५६.१२
मध्य प्रदेश     १०,९७०.४४
पश्चिम बंगाल     १०,५१३.४६
महाराष्ट्र     ८,८२८.०८
राजस्थान     ८,४२१.३८
ओडिशा     ६,३२७.९२
तमिळनाडू     ५,७००.४४
आंध्र प्रदेश     ५,६५५.७२
कर्नाटक     ५,०९६.७२
गुजरात     ४,८६०.४२
छत्तीसगढ     ४,७६१.३०
झारखंड     ४,६२१.५८
आसाम     ४,३७१.३८
तेलंगणा     २,९३७.५८
केरळ     २,६९०.२०
पंजाब     २,५२५.३२
अरुणाचल प्रदेश     २,४५५.४४
उत्तराखंड     १,५६२.४४
हरियाणा     १,५२७.४८
हिमाचल प्रदेश     १,१५९.९२
मेघालय     १,०७१.९०
मणिपूर     १,०००.६०
त्रिपुरा     ९८९.४४
नागालँड     ७९५.२०
मिझोरम     ६९८.७८  
गोवा     ५३९.४२ 
सिक्कीम     ५४२.२२
एकूण     १,३९,७५०.९२ 
(आकडे कोटी रुपयांत)

Web Title: Uttar Pradesh, Bihar received the most funds from the Centre, while all the states shared Rs 1.4 lakh crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.