ऐकावं ते नवलच! भाजपा खासदाराने मच्छर चावल्याने थांबवली ट्रेन; रेल्वे प्रशासनाला धरलं धारेवर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 06:34 PM2023-04-25T18:34:37+5:302023-04-25T18:35:20+5:30

उत्तर प्रदेशातून एक अनोखी घटना समोर आली आहे.

Uttar Pradesh BJP MP Rajveer Singh stopped the train and alerted the authorities due to mosquito bites in the Gomti Express  | ऐकावं ते नवलच! भाजपा खासदाराने मच्छर चावल्याने थांबवली ट्रेन; रेल्वे प्रशासनाला धरलं धारेवर

ऐकावं ते नवलच! भाजपा खासदाराने मच्छर चावल्याने थांबवली ट्रेन; रेल्वे प्रशासनाला धरलं धारेवर

googlenewsNext

MP stopped the train in UP । लखनौ : उत्तर प्रदेशातून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे मच्छर चावल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या (BJP) खासदाराने चक्क ट्रेन थाबंवली असून याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. खरं तर एटाचे खासदार राजवीर सिंह लखनौच्या चारबाग रेल्वे स्थानकावरून दिल्लीला निघालेल्या गोमती एक्स्प्रेस (१२४१९) ट्रेनमधून प्रवास करत होते. प्रवासादरम्यान त्यांना मच्छर चावली. मग खासदार महोदयांनी जे केले ते पाहून सर्वांनाच धक्का बसला.

दरम्यान, खासदार सिंह यांनी ट्रेन थांबवत रेल्वे प्रशानसाला स्वच्छतेच्या कारणास्तव धारेवर धरले. सिंह यांचा राग पाहून घाईगडबडीत रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि गाडी थांबवल्यानंतर संपूर्ण बोगीमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. बोगीची साफसफाई झाल्यानंतरच गाडी तिथून रवाना करण्यात आली. लक्षणीय बाब म्हणजे राजवीर सिंह हे ट्रेनच्या पहिल्या एसी डब्यात प्रवास करत होते. पण रेल्वेचे शौचालय अस्वच्छ असून डास चावत आहेत. त्यामुळे इथे बसणे देखील कठीण झाले असल्याचे सिंह यांनी सांगितले. 
 
रेल्वेच्या कारभाराची सोशल मीडियावर चर्चा 
रेल्वेच्या या निर्णयाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. सामान्य माणसाला प्रवासादरम्यान अशा समस्यांशी सतत झगडावे लागते, असे नेटकरी म्हणत आहेत. पण त्यांचे क्वचितच ऐकले जाते. सामान्य माणूस केवळ तक्रार करत राहतो. पण जेव्हा नेते मंडळींना अडचण येते तेव्हा प्रशासन लगेच पाऊल उचलते. रेल्वेत प्रवास करताना लोक नेहमी तक्रार करतात की त्यांच्या तक्रारी ऐकून घेणारे कोणी नाही, अशा शब्दांत नेटकरी या प्रकरणावर आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

Web Title: Uttar Pradesh BJP MP Rajveer Singh stopped the train and alerted the authorities due to mosquito bites in the Gomti Express 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.