उत्तर प्रदेशात भाजपची जुन्या शस्त्रांनाच नवी धार!
By admin | Published: December 8, 2015 02:02 AM2015-12-08T02:02:52+5:302015-12-08T02:02:52+5:30
भारतीय जनता पार्टी राज्यात जुन्या शस्त्रांनाच नव्याने धार लावण्याच्या तयारीत आहे. पहिले लव्ह जिहाद, मग गोमांस आणि आता अयोध्या. हिंदुत्वाशी संबंधित या जुन्या शस्त्रांचा उत्तर
मीना कमल, लखनौ
भारतीय जनता पार्टी राज्यात जुन्या शस्त्रांनाच नव्याने धार लावण्याच्या तयारीत आहे. पहिले लव्ह जिहाद, मग गोमांस आणि आता अयोध्या. हिंदुत्वाशी संबंधित या जुन्या शस्त्रांचा उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत वापर करण्याचा पक्षाचा विचार आहे.
राज्याच्या कुठल्याही आखाड्यातील या निवडणूक शस्त्रांना अधिक धार देण्यासाठी समाजवादी पार्टीही भाजपच्या खांद्याला खांदा लावून मार्गक्रमण करीत असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे हिंदू-मुस्लिम मतांसाठी भाजप आणि सपात सुरू असलेल्या जुगलबंदीत आता बहुजन समाज पार्टीनेही उडी घेतली आहे. अयोध्येतील वादग्रस्त वास्तू बाबरी मशीद असल्याबाबत या पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी केलेल्या विधानाकडेही याच दृष्टिकोनातून बघितले जात आहे. लोकसभेची गेली निवडणूक वगळता नव्वदच्या दशकापासून आतापर्यंत राज्यात झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये हिंदू-मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाचा थेट लाभ भाजप व सपालाच होत आला आहे. इ.स.२०१७ च्या विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वी उभय पक्ष मोठ्या खुबीने आपल्या जुन्या समीकरणांवर लक्ष्य केंद्रित करून आहेत. हिंदू अजेंड्याशी संबंधित भाजपच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना कुठलीही चूक होऊ नये याची काळजी सपा घेत आहे.
नवी दिल्ली : बहुजन समाज पार्टी उत्तर प्रदेशात २०१७ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेससह कुठल्याही पक्षासोबत समझोता करणार नसून सर्व जागा स्वबळावर लढणार आहे. बसपाप्रमुख मायावती यांनी सोमवारी संसद भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना सांगितले की, काँग्रेस असो वा भाजप कुठल्याही पक्षासोबत आम्ही युती करणार नाही.
बिहारमध्ये भाजपला मदत करण्यासाठी सपा लालूप्रसाद आणि नितीशकुमार यांच्या महाआघाडीतून बाहेर पडली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.