उत्तर प्रदेशात बॉम्बस्फोट, रेल्वे ट्रॅक उडवण्याचा होता कट

By admin | Published: March 28, 2017 12:25 PM2017-03-28T12:25:08+5:302017-03-28T12:44:23+5:30

उत्तर प्रदेशातील संत कबीर नगरमधील रेल्वे स्टेशनजवळ बॉम्बस्फोट झाला आहे. या घटनेत एक जण जखमी झाल्याची माहिती आहे.

In Uttar Pradesh, the blasts were a blow to the railway track | उत्तर प्रदेशात बॉम्बस्फोट, रेल्वे ट्रॅक उडवण्याचा होता कट

उत्तर प्रदेशात बॉम्बस्फोट, रेल्वे ट्रॅक उडवण्याचा होता कट

Next
ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 28 - उत्तर प्रदेशातील संत कबीर नगरमधील रेल्वे स्टेशनजवळ बॉम्बस्फोट झाला आहे. या घटनेत एक जण जखमी झाल्याची माहिती आहे. सुदैवानं हा कमी तीव्रतेचा स्फोट असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं नाही. दरम्यान, या स्फोटानंतर पोलिसांना परिसरातून कमी तीव्रेतचे आणखी तीन बॉम्ब आढळून आले आहेत. हे बॉम्ब रेल्वे ट्रॅकवर पेरण्यात आले होते. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, संत कबीर नगर परिसरातील रेल्वे ट्रॅक उडवून मोठा घातपात घडवण्याचा कट रचण्यात आला होता, मात्र हा प्रयत्न अयशस्वी ठरला. उत्तर प्रदेशातील फॉरेन्सिक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. 
 
दरम्यान, 7 मार्च रोजी भोपाळ-उज्जैन प्रवासी रेल्वेत बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता.  भोपाळहून उज्जैनला जाणाऱ्या रेल्वेमध्ये जबडीत स्टेशनजवळ आयईडी बॉम्बचा स्फोट झाला. यात दहा जण जखमी झाले होत.  यापूर्वी 2016मध्ये कानपूर रेल्वे स्टेशनवर स्फोट झाला होता. यात इंदुर-पाटणा एक्स्प्रेसचे 14 डबे रुळावरुन घसल्याने 120 प्रवाशांचा मृत्यू झाला होता तर 200 हून अधिक जण जखमी झाले होते.

Web Title: In Uttar Pradesh, the blasts were a blow to the railway track

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.