जर मुलींना छेडण्याचा प्रयत्न केला तर समजा 'राम नाम सत्य है' - योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 03:12 PM2024-02-04T15:12:41+5:302024-02-04T15:14:55+5:30

योगी आदित्यनाथ यांनी मुलींची छेड काढणाऱ्यांना कडक शब्दांत इशारा दिला आहे.

Uttar Pradesh Chief Minister Yodi Adityanath praised Prime Minister Narendra Modi and warned those who molest girls | जर मुलींना छेडण्याचा प्रयत्न केला तर समजा 'राम नाम सत्य है' - योगी आदित्यनाथ

जर मुलींना छेडण्याचा प्रयत्न केला तर समजा 'राम नाम सत्य है' - योगी आदित्यनाथ

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुलींची छेड काढणाऱ्यांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. राज्यातील महिलांच्या सुरक्षेबद्दल बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. जर कोणी महिलांसोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला, बहिणीची किंवा मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केला, तर पुढील चौकात पोलीस त्याला पकडतील, असे त्यांनी सांगितले. कबीर मगर महोत्सवाच्या समारोप समारंभात ६०० जोडप्यांच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ३६० कोटी रुपयांच्या ११४ प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.

महिलांच्या सुरक्षेची ग्वाही देताना योगी म्हणाले की, राज्यात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे कोणी महिलेची छेड काढली तर पोलीस लगेचच त्याला त्याच्या पुढील चौकात पकडतील. लक्षात ठेवा की, जर कुणी महिलेची किंवा बहिणीची छेड काढली तर 'राम नाम सत्य है' झाले म्हणून समजा. 

सामूहिक विवाह योजना आणि सरकारच्या इतर योजनांबद्दल बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, सरकारच्या या कल्याणकारी योजना लोकांच्या जीवनात बदल घडवणारे महत्त्वाचे घटक बनत आहेत. आम्ही या जिल्ह्यात मेडिकल कॉलेज आणि बस स्टॉपसाठी रस्ते बांधण्यासाठी जमिनीचा शोध घेत आहोत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात कमांड एकात्मिक सेंटर बांधले जात आहे. याद्वारे संपूर्ण जिल्ह्यावर एकाच ठिकाणावरून लक्ष ठेवता येईल. त्यामुळे जर कोणी महिला किंवा मुलीचा विनयभंग करण्याचा अथवा चोरी किंवा दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला, तर पुढच्या चौकात पोहोचेपर्यंत पोलीस त्यांचे 'राम नाम सत्य है' करतील. 

भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था - योगी 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्याला दाद देताना योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच आज मोदींच्या नेतृत्वाखाली देश जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. २०२४ मध्ये पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान होण्याची संधी द्या जेणेकरून भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकेल, असे आवाहन योगींनी केले. 

Web Title: Uttar Pradesh Chief Minister Yodi Adityanath praised Prime Minister Narendra Modi and warned those who molest girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.