उत्तर प्रदेशात हे आहेत मुख्यमंत्रिपदाचे दावेदार

By admin | Published: March 12, 2017 03:44 AM2017-03-12T03:44:31+5:302017-03-12T03:44:31+5:30

उत्तर प्रदेशात भारतीय जनता पार्टी सत्तारूढ होणार हे स्पष्ट झाल्यावर आता मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार याचे अंदाज बांधले जात आहेत. परंतु पक्षातील काही नेते या शर्यती

Uttar Pradesh is the chief minister's contender | उत्तर प्रदेशात हे आहेत मुख्यमंत्रिपदाचे दावेदार

उत्तर प्रदेशात हे आहेत मुख्यमंत्रिपदाचे दावेदार

Next

उत्तर प्रदेशात भारतीय जनता पार्टी सत्तारूढ होणार हे स्पष्ट झाल्यावर आता मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार याचे अंदाज बांधले जात आहेत. परंतु पक्षातील काही नेते या शर्यतीत आघाडीवर आहेत.

राजनाथसिंग
भाजपाचे ज्येष्ठ नेते राजनाथसिंग हे सध्या केंद्रीय गृहमंत्री आहेत. आपण ११ मार्चनंतरही गृहमंत्रीच राहणार हे त्यांनी पूर्वीच जाहीर केले आहे. परंतु मुख्यमंत्री म्हणून त्यांचा अनुभव आणि इतर कुणाच्या नावावर सहमती न झाल्यास या पदासाठी राजनाथसिंग हे एकमेव पर्याय असतील. खुद्द राजनाथसिंग मात्र केंद्र सोडून राज्याच्या राजकारणात येऊ इच्छित नाहीत, हे विशेष!

केशव प्रसाद मौर्य
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष केशवप्रसाद मौर्य हे मुख्यमंत्रिपदाचे सर्वात प्रबळ दावेदार आहेत. ते अतिमागास वर्गातील असून हा वर्ग उत्तर प्रदेशात पूर्णत: भाजपाच्या पाठीशी उभा राहिला आहे. मौर्य यांनी प्रचार काळात शंभरावर सभा घेऊन कार्यकर्त्यांमधील आपले स्थान भक्कम केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या जवळचे समजले जातात. याचाही फायदा त्यांना मिळू शकतो.

योगी आदित्यनाथ
योगी आदित्यनाथ यांचा उत्तर प्रदेश राजकारणातील प्रभाव लपून राहिलेला नाही. गोरखपूरमध्ये नाहीतर संपूर्ण उत्तर प्रदेशातील दिग्गजांमध्ये त्यांचा समावेश आहे. ते राज्यातील एक बडे लोकनेता असून गोरखपूर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात त्यांचा प्रचंड दबदबा आहे. परंतु हेच वैशिष्ट्य त्यांच्या विरोधात जाऊ शकते. कारण नरेंद्र मोदी आणि अमित शाह अशा कुठल्याही नेत्याच्या हाती सूत्रे देणार नाहीत जो नंतर त्यांची अवहेलना करेल.

महेश शर्मा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका सहसरकार्यवाहाशी घनिष्ठ संबंध असलेले महेश शर्मा हेसुद्धा मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. सध्या ते नोएडा येथून खासदार आणि केंद्रीय मंत्री आहेत. पक्षातर्फे त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या जबाबदारीतून मुक्त करून राज्याची सूत्रे सोपविली जाऊ शकतात.

श्रीकांत शर्मा
यांना मथुरेतून तिकीट देऊन एक मजबूत खेळी खेळली होती. सध्या ते भाजपाचे राष्ट्रीय सचिव आणि प्रवक्ता आहेत. अर्थात त्यांचा अल्प अनुभव त्यांना मुख्यमंत्रिपदापासून दूर ठेवू शकतो. परंतु अनपेक्षितपणे त्यांच्या पदरी हे पद आल्यास आश्चर्य वाटू नये. सर्बानंद सोनोवाल यांना आसामचे मुख्यमंत्री बनविल्यानंतर श्रीकांत शर्मा यांच्या समर्थनातही वातावरण निर्माण होताना दिसत आहे.

दिनेश शर्मा
दिनेश शर्मा हे लखनौचे महापौर आणि भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या निवडीबाबत पक्षही बराच सकारात्मक दिसतो आहे. शर्मा हे एक सर्वपरिचित चेहरा आहेत. जातीय समीकरणाचा विचार केल्यास शर्मा हे उत्तर प्रदेशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या ब्राह्मण जातीचे आहेत. याचा लाभ त्यांना मिळू शकतो.

मनोज सिन्हा
मनोज सिन्हा हे गाझिपूरचे खासदार असून सवर्णांचे प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. ते मोदी आणि शहा यांच्या अत्यंत जवळचे आहेतच. शिवाय पूर्वांचलमधून मुख्यमंत्री बनविण्याचा निर्णय झाल्यास त्यांची लॉटरी लागू शकते.

Web Title: Uttar Pradesh is the chief minister's contender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.