"1 लाख भोंगे उतरवले असून पुन्हा भोंगे लावण्याची हिंमत करू नये अन्यथा..."; योगींचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2022 12:10 PM2022-05-08T12:10:35+5:302022-05-08T12:12:01+5:30

Yogi Adityanath : उत्तर प्रदेशातील विविध धार्मिक स्थळांवरुन सुमारे 1 लाख लाऊडस्पीकर काढण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात लाऊडस्पीकर हटवल्यामुळे आता संपूर्ण उत्तर प्रदेशातील आवाजही कमी झाला आहे.

uttar pradesh cm yogi adityanath on loudspeakers | "1 लाख भोंगे उतरवले असून पुन्हा भोंगे लावण्याची हिंमत करू नये अन्यथा..."; योगींचा इशारा

"1 लाख भोंगे उतरवले असून पुन्हा भोंगे लावण्याची हिंमत करू नये अन्यथा..."; योगींचा इशारा

Next

नवी दिल्ली - महाराष्ट्रात मशिदीवरील लाऊडस्पीकरवरुन गदारोळ सुरू आहे. लाऊडस्पीकर उतरवण्यासाठी मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशात कुठल्याही गोंधळाशिवाय लाऊडस्पीकर खाली उतरवले जात आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी सांगितले की, आतापर्यंत राज्यात सुमारे 1 लाख लाऊडस्पीकर बंद करण्यात आले  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, आमच्या सरकारने हा मुद्दा चांगल्याप्रकारे हाताळला आहे. उत्तर प्रदेशातील विविध धार्मिक स्थळांवरुन सुमारे 1 लाख लाऊडस्पीकर काढण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात लाऊडस्पीकर हटवल्यामुळे आता संपूर्ण उत्तर प्रदेशातील आवाजही कमी झाला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लाऊडस्पीकर काढताना कुठेही वाद झालेला नाही. यूपी पोलिस सातत्याने लाऊडस्पीकरविरोधात मोहीम राबवत आहेत.

"राज्यात आतापर्यंत एक लाख भोंगे उतरवले गेले असून पुन्हा भोंगे लावण्याची हिंमत कुणी करू नये" असा इशारा योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे. तसेच काढून टाकलेले लाऊडस्पीकर पुन्हा लावले जाऊ नयेत, याची काळजी घेण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर सोपवली आहे. काढलेले भोंगे पुन्हा लावल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असं योगी म्हणाले. "धार्मिक कार्यक्रम धार्मिक स्थळांच्या आवारातच मर्यादित असावेत, रस्त्यावर कोणताही उत्सव आयोजित करू नये आणि या कार्यक्रमांमुळे सामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये, याची काळजी घेतली जावी" असंही म्हटलं आहे.

सीएम योगी आदित्यनाथ यांनी आणखी एका मुद्द्यावरुन स्वतःच्या सरकारची पाठ थोपटली. ते म्हणाले की, आम्ही केवळ लाऊडस्पीकरचा प्रश्न सोडवला नाही तर रस्त्यावरील नमाजाचा प्रश्नही सोडवला आहे. रस्त्यावर नमाज अदा करू नये, अशा सक्त सूचना आम्ही दिल्या होत्या. आता रस्त्यावर कोणीही नमाज अदा करत नाही. यूपीमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. तरीदेखील ईदसारख्या मुहूर्तावर कुठेही रस्त्यावर नमाज अदा केल्याचे वृत्त नाही. लोक स्वतःही पुढे येऊन रस्त्यांऐवजी घरांमध्ये किंवा मशिदींमध्ये नमाज अदा करून आदेशाचे पालन करत आहेत.

अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी लखनऊ येथे जारी केलेल्या निवेदनात म्हटले होते की, सर्व धार्मिक स्थळांवरून बेकायदेशीरपणे लावलेले लाऊडस्पीकर कोणताही भेदभाव न करता काढले जात आहेत आणि असे सर्व लाऊडस्पीकर बेकायदेशीर श्रेणीत ठेवण्यात आले आहेत. परवानगी नसलेलेच लाऊडस्पीकर काढण्यात येत असून लाऊडस्पीकरबाबतच्या कारवाईदरम्यान उच्च न्यायालयाचे आदेशही लक्षात ठेवले जात असल्याचेही कुमार म्हणाले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: uttar pradesh cm yogi adityanath on loudspeakers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.