योगी आदित्यनाथ यांचा विजय लोकशाहीचा विजय नाही : माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. व्हाय. कुरैशी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 02:22 PM2022-03-28T14:22:37+5:302022-03-28T14:30:03+5:30

योगी आदित्यनाथ यांच्या विजयावर निवडणूक आयोगाचे माजी मुख्य आयुक्त डॉ. एस. व्हाय. कुरैशी यांनी मोठं विधान करत हा लोकशाहीचा विजय नसल्याचं म्हटलं.

uttar pradesh cm Yogi Adityanaths victory is not a victory for democracy Former Chief Election Commissioner S y Qureshi | योगी आदित्यनाथ यांचा विजय लोकशाहीचा विजय नाही : माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. व्हाय. कुरैशी

योगी आदित्यनाथ यांचा विजय लोकशाहीचा विजय नाही : माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. व्हाय. कुरैशी

googlenewsNext

नुकतेच पाच राज्यांचे निकाल जाहीर करण्यात आले. पंजाब वगळता अन्य चार राज्यांमध्ये भाजपनं मोठी मुसंडी मारली. उत्तर प्रदेशातयोगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा भाजपनं सरकार स्थापन केलं आहे. परंतु योगी आदित्यनाथ यांच्या विजयावर निवडणूक आयोगाचे माजी मुख्य आयुक्त डॉ. एस. व्हाय. कुरैशी यांनी मोठं विधान करत हा लोकशाहीचा विजय नसल्याचं म्हटलं.

"योगी आदित्यनाथ यांचा विजय हा जातीयवादाचा विजय आहे. ध्रुवीकरण ही गेल्या २० वर्षांपासून निवडणुकीची खेळी आहे. परिस्थिती अशी आहे की दोन मुलेही समोरासमोर भांडली तरी त्याला ध्रुवीकरण म्हणतात," असं कुरैशी म्हणाले. दैनिक भास्करला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं.

"फाळणीच्या वेळी जास्तीत जास्त ध्रुवीकरण झालं. मग बाबरीच्या वेळी आणि आत्ताचा हा देशातील ध्रुवीकरणाचा तिसरा टप्पा आहे. देशातील जनतेला तेजीनं जातीयवादी केलं जाक आहे. भारत धर्मनिरपेक्ष आहे कारण हिंदु धर्मनिरपेक्ष आहे. फाळणी झाली तेव्हा पाकिस्तान हा मुस्लिम देश झाला, पण भारत हा हिंदू राष्ट्र न होता धर्मनिरपेक्ष देश झाला. मग सर्व काही सामान्य झालं. आताचीही वेळ निघून जाईल अशी मी अपेक्षा करतो," असंही ते म्हणाले.

"मी EVM समर्थक पण..."
"मी ईव्हीएमचा समर्थक आहे. परंतु पोस्टल आणि ईव्हीएमचे निकाल कायमच वेगळे असतात. पोस्टल मतं कायमच भाजपच्या बाजूने जातात. ईव्हीएममध्ये जर गडबड झाली असती तर बंगालची निवडणूक भाजप हरली नसती, यासाठी मी ईव्हीएमला भरवशाचं मानतो. भाजपनं बंगालमध्ये कोणतीही कसर सोडली नव्हती. बॅलेटवर पुन्हा येण्याचा कोणताही प्रश्नच नाही. जर अजून पुष्टी करायची असेल तर VVPAT मोजून घ्यावं," असंही ते म्हणाले.

"निवडणुक आयोगावरील भरवसा कमी झाला"
यावेळी कुरैशी यांना निवडणूक आयोगावरी भरवसा कमी झाला आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. "हो, दुर्देव आहे पण खरं आहे. देशाला निवडणूक आयोगावर खुप भरवसा होता. मला असं बोलण्यात खुप दु:ख होतं. मी यावर काही बोलू इच्छित नाही. मी माझ्या नंतरच्या लोकांबद्दल वाईट बोलतोय असं वाटेल. याचं कारण तिथली लोकं आहे. काही शेषन यांच्यासारखे कठोर लोक सापडतील, तर काही कमकुवत आणि काही चमचेगिरी करणारे सापडतील," असंही कुरैशी म्हणाले.

"यासाठी नियुक्तीची पद्धत कॉलेजियम सिस्टम प्रमाणे बदलायला हवी. निवडणूक आयोगात जे धाडस होते त्यावर आता प्रश्न उपस्थित केला जात आहे. कुणी त्याच्याकडे बोट दाखवलं तर मला वेदना होतात, कुणीतरी मला कानशिलात लगावतंय असं वाटतं," असंही ते म्हणाले.

Web Title: uttar pradesh cm Yogi Adityanaths victory is not a victory for democracy Former Chief Election Commissioner S y Qureshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.