अॅपलच्या मॅनेजरला पोलिसांनी घातल्या गोळ्या, कार न थांबवल्यानं आला संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 12:42 PM2018-09-29T12:42:10+5:302018-09-29T17:57:07+5:30
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काल रात्री उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधल्या गोमती नगर या उच्चभ्रू परिसरात उत्तर प्रदेशच्या पोलीस कॉन्स्टेबलनं अॅपलच्या मॅनेजरची गोळ्या घालून हत्या केली आहे.
लखनऊ- उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काल रात्री उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधल्या गोमती नगर या उच्चभ्रू परिसरात उत्तर प्रदेशच्या पोलीस कॉन्स्टेबलनं अॅपलच्या मॅनेजरची गोळ्या घालून हत्या केली आहे. पोलीस कॉन्स्टेबलच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले विवेक तिवारी हे अॅपल कंपनीमध्ये मॅनेजर आहेत.
विशेष म्हणजे सहका-याला सोडण्यास गेले असताना विवेकची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. काल रात्री उशिरा विवेक स्वतःच्या सहका-याला बरोबर घेऊन कामावरून घरी परतत होता. त्याच दरम्यान गोमतीनगर परिसरात दोन पोलिसांनी त्याला गाडी थांबवण्याचा इशारा केला. परंतु विवेकनं गाडी थांबवली नाही. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या गाडीवर गोळीबार केला, त्या गोळीबारात एक गोळी विवेकच्या डोक्यातून आरपार गेली आणि विवेकचा मृत्यू झाला.
या प्रकरणात कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी याला अटक केली आहे. घटनास्थळी गाडीमध्ये उपस्थित असलेल्या सना खाननं सांगितलं की, मी माझ्या सहका-याबरोबर घरी जात होती. त्याचं नाव विवेक तिवारी आहे. गोमती नगरजवळ आमची गाडी उभी होती. त्याच वेळी दोन पोलीस समोरून आले म्हणून आम्ही त्यांची नजर चुकवून तिकडून निघण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अचानक गोळीबार करण्यात आला. आम्ही गाडी वेगानं दामटण्याचा प्रयत्न केला. पुढे आमची गाडी एका दिवाळाला धडकली आणि विवेकच्या डोक्यातून रक्तस्रावास सुरुवात झाली. मी सगळ्यांकडे मदतीची याचना केली. त्यावेळी पोलीस आले आणि त्यांनी विवेकला रुग्णालयात दाखल केलं. परंतु तोपर्यंत विवेकचा मृत्यू झाला होता.
I am not in a condition to say anything right now. Even I want the culprit to be punished. I am under no pressure to hide the truth: Woman who was present with Vivek Tiwari when he was shot at by Lucknow police last night. pic.twitter.com/lBh9A2VIOP
— ANI UP (@ANINewsUP) September 29, 2018
This is a sad incident. A case of murder (section 302 IPC) has been registered against the two policemen. Stringent action will be taken: Anand Kumar, UP ADG Law & Order on incident where Vivek Tiwari was shot at by police personnel yesterday. He later succumbed to his injuries pic.twitter.com/5Su6E4VfjQ
— ANI UP (@ANINewsUP) September 29, 2018
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आल्यावर होणार अंत्यसंस्कार- पत्नी
विवेकची पत्नी कल्पना तिवारीच्या मते, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येत नाहीत तोपर्यंत पतीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार नाहीत. तसेच त्यांनी पोलीस आणि उत्तर प्रदेश सरकारला काही प्रश्नही विचारले आहेत. जर माझा पती तुम्हाला संशयित वाटत होता, त्यांनी गाडी थांबवली नाही, तर तुम्ही आरटीओमध्ये गाडीचा नंबर देऊन कारवाई करू शकत होतात. पोलिसांनी त्यांना गोळ्या का घातल्या?, त्यावेळी माझ्या पतीबरोबर असलेल्या महिलेला मी ओळखते. मला रुग्णालयातील एका कर्मचा-यानं तुमचा पती आणि त्याची सहकारी जखमी असल्याचं सांगितलं. परंतु पोलिसांनी मला याची काहीही कल्पना दिली नाही.
#WATCH Kalpana Tiwari,wife of deceased Vivek Tiwari says,"Police had no right to shoot at my husband,demand UP CM to come here&talk to me." He was injured&later succumbed to injuries after a police personnel shot at his car late last night,on noticing suspicious activity #Lucknowpic.twitter.com/buJyDWts5n
— ANI UP (@ANINewsUP) September 29, 2018
#Lucknow At 2 am last night, I saw a suspicious car with its lights off, when I approached the car, the driver (Vivek Tiwari) tried to run over me thrice to kill me. I fired a bullet in self-defence, he then immediately took off from the spot: Police constable Prashant Chaudhary pic.twitter.com/ZSLiATeCU6
— ANI UP (@ANINewsUP) September 29, 2018
या प्रकरणाची सीबीआयमार्फत निष्पक्ष चौकशी केली जावी, अशी मागणी विवेकच्या नातेवाईकांनी केली आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानुसार, विवेक तिवारीचा मृत्यू गोळी लागून झाला आहे. विवेकनं माझ्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला म्हणून मी त्याच्यावर गोळी झाडली, असं त्या पोलीस कॉन्स्टेबलनं सांगितलं आहे.
#Lucknow: Was he a terrorist that police shot at him? We choose Yogi Adityanath as our representative, we want him to take cognizance of the incident and also demand an unbiased CBI inquiry: Vishnu Shukla, brother-in-law of deceased Vivek Tiwari pic.twitter.com/GOx91fu5bV
— ANI UP (@ANINewsUP) September 29, 2018