"देवीने स्वप्नात येऊन सांगितलं, बळी द्या म्हणजे मुलगा बरा होईल", त्यानंतर घडलं भयानक...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 06:16 PM2024-12-02T18:16:07+5:302024-12-02T18:16:18+5:30
Uttar Pradesh Crime News:
उत्तर प्रदेशमधील देवरिया येथे २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या एका १२ वर्षीय मुलीच्या हत्येप्रकरणी पोलिस तपासामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मुलीची जादुटोण्यासाठी हत्या करण्यात आली होती, अशी माहिती एसपी संकल्प शर्मा यांनी दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृत मुलीच्या वडिलांच्या मामा-मामीनेच बळी देण्यासाठी हे क्रूर कृत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे.
या प्रकरणी पोलिसांनी शेषनाथ यादव आणि त्याची पत्नी सविता यांना अटक केली आहे. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीनंतर हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकू आणि रक्ताने माखलेला एक कपडाही जप्त करण्यात आला आहे.
आरोपी दाम्पत्याने सांगितलं की, त्यांचा २२ वर्षांचा एक मुलगा असून, तो मानसिक आजाराने ग्रस्त आहे. अशा परिस्थितीत मला स्वप्नात एक देवी दिसायची. स्वप्नात दिसणारी ही देवी मला एका मुलीची हत्या करून तिच्या मृतदेहावरील पाच ठिकाणचं रक्त काढून जादूटोणा केल्यास माझा मुलगा बरा होईल, असं सांगायची, असा दावा केला आहे.
यादरम्यान, हे दाम्पत्य उत्तराखंडमधील गावात एका लग्नासाठी गेलं होतं. तिथे त्यांना नातेवाईकांची एक मुलगी दिसली. त्यांनी तिची हत्या करून तिचा मृतदेह ४०० मीटर अंतकावर नेऊन लपवला. मुलीच्या आई वडिलांनी खूप शोधाशोध केल्यावरही मृतदेह काही सापडला नाही. त्यानंतर पोलिसांकडे अपहरणाची तक्रार देण्यात आली. त्यानंतर या मुलीचा मृतदेह सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सापडला. त्यानंतर आरोपींचा कसून शोध घेत पोलिसांनी आरोपी शेषनाथ यादव आणि त्याची पत्नी सविता यांना अटक केली.