कमाल! Videos बनवून देवरियाच्या तरुणाने फक्त 6 महिन्यांत कमावले तब्बल 40 लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 06:41 PM2022-10-21T18:41:48+5:302022-10-21T19:01:02+5:30
सतीश कुशवाहा सध्या फक्त युट्युब अॅडसेन्समधून एका महिन्यात सरासरी 5 ते 8 लाख रुपये कमावतो
उत्तर प्रदेशातील देवरिया येथील एका गावातील मुलाला चित्रपट सृष्टीत करिअर करायचे होतं. पण त्याच्याकडे कोर्स फीसाठी पैसे नव्हते. त्यानंतर त्याने स्कॉलरशिपच्या माध्यमातून इंजिनियरिंगचं शिक्षण घेतलं. पण इंजिनियर होण्यास नकार दिला. आज हा मुलगा एक प्रसिद्ध Youtube क्रिएटर बनला आहे. सतीश कुशवाहा असं या तरुणाचं नाव आहे. 28 वर्षीय सतीश कुशवाहाच्या Satish K Videos चे यूट्यूब चॅनलचे 11 लाखांहून अधिक सब्सक्राइबर्स आहेत. त्याच्या चॅनलवर तो ऑनलाइन कमाई करण्याचे मार्ग सांगतो.
युट्युबच्या यशामुळे त्याने वयाच्या 25 व्या वर्षी मुंबईमध्ये फ्लॅट खरेदी केला. सतीश कुशवाहा सध्या फक्त युट्युब अॅडसेन्समधून एका महिन्यात सरासरी 5 ते 8 लाख रुपये कमावतो. यामध्ये ब्रँड प्रमोशन, एफिलिएट मार्केटिंग इत्यादींची कमाई जोडल्यास त्याचे उत्पन्न एका महिन्यात 10 ते 12 लाख रुपयांपर्यंत पोहोचतं. सतीशने गेल्या 6 महिन्यांत Youtube Adsense मधून सुमारे 40 लाख रुपये (50 हजार डॉलर) कमावले आहेत. Youtube मधून होणारी कमाई फक्त अॅडसेन्समध्ये डॉलरमध्ये येते. त्याच वेळी, स्वतंत्र सोशल मीडिया एनालिटिक्स वेबसाइट socialblade.com चा अंदाज आहे की Satish K Videos चॅनेलवरून, दरमहा 1.5 लाख ते 22 लाख रुपये कमाई करणे शक्य आहे.
सतीशने दिलेल्या माहितीनुसार, चाळीतील एकाच खोली त्याच्यासाठी आणि इतर 5 लोकांसाठी किचन, बेडरूम आणि लिव्हिंग रूम होती. खराब आवाज रेकॉर्ड होऊ नये म्हणून रेकॉर्डिंगच्या वेळी खोलीतील पंखा बंद ठेवावा लागला. त्यामुळे उन्हाळ्यात गरमीमुळे खूप त्रास व्हायचा. लहानपणापासूनच चित्रपट निर्मितीची आवड होती. कोणाचा फोन मिळायचा तर तो व्हिडीओ बनवायला सुरुवात करायचा. मोठं झाल्यावर त्याला चित्रपट निर्माता बनायचे होतं. जेव्हा त्याने घरातील सदस्यांना सांगितलं की, मला फिल्म मेकर व्हायचं आहे, तेव्हा सुरुवातीला ते काय आहे ते त्यांना समजले नाही.
सुरुवातीला तो यूट्यूबवर असे व्हिडिओ पाहत असे, ज्यामुळे त्याला चित्रपट सृष्टीची माहिती मिळायची. त्यानंतर त्याच्या एका मित्राने सांगितले की, यूट्यूबवरून तुम्ही व्हिडिओ बनवून पैसे कमवू शकता. दरम्यान, 2015 मध्ये सतीशने ब्लॉगिंगही सुरू केले. पण त्यातून कमाई करणे सोपे नव्हते. ब्लॉगिंगमधून पहिले 100 डॉलर्स कमवायला दीड वर्ष लागले. मुंबईत चाळीत राहायला लागल्यानंतर 3 वर्षांनी वयाच्या 25व्या वर्षी त्याने मुंबईत घर विकत घेतले. हे घर लहान आहे पण स्वतःचं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.