Uttar Pradesh Election 2022: महाराष्ट्रातून यूपीत असंख्य कॉल्स; ‘मोदी की हवा अभी भी है क्या?’
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 07:30 AM2022-02-18T07:30:44+5:302022-02-18T07:32:00+5:30
झाशीपासून गोरखपूरपर्यंतच्या भागाने गेल्यावेळी भाजपला भरभरून मते दिलेली. त्यामुळे भाजपच्या बड्या नेत्यांची फौजच आता मैदानात उतरलीय.
सचिन जवळकोटे
झाशी : उत्तर प्रदेशच्या निवडणुकांकडे बहुतांश राज्यांचे बारीक लक्ष. ही भूमी सांगते देशाच्या राजकारणाचा कल. विशेष म्हणजे महाराष्ट्रातल्या काही नेत्यांनाही इथल्या घडामोडींबद्दल प्रचंड उत्सुकता. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक सभेत ‘योगी सरकारही आयेगी,’ असे वारंवार बजावताहेत. पहिल्या दोन टप्प्यातील मतदानाची आकडेवारी भाजपसाठी समाधानकारक नव्हती. मुरादाबाद, बिजनौर, अमरोहा अन् सहारनपूर जिल्ह्यात अत्यंत चुरशीने मतदान झालेय. अपवाद वगळता पूर्वीपासूनच हा पट्टा समाजवादी पार्टीचा बालेकिल्ला राहिलेला.
इथल्या मतदानानंतर अखिलेश अधिकच आक्रमक झाल्याचे स्पष्टपणे जाणवू लागलेय. ‘भाजपच्या नेत्यांचे पडलेले चेहरेच सांगतात की यूपीचा निकाल काय लागणार, पहिल्या दोन टप्प्यात सपा शंभर पार,’ या भाषेत ते आता प्रचंड आत्मविश्वासाने कार्यकर्त्यांशी बोलू लागलेत.
भाजपसाठी मात्र पुढच्या टप्प्यातले मतदारसंघ अधिक विश्वासाचे. झाशीपासून गोरखपूरपर्यंतच्या भागाने गेल्यावेळी भाजपला भरभरून मते दिलेली. त्यामुळे भाजपच्या बड्या नेत्यांची फौजच आता मैदानात उतरलीय. खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तर थेट रस्त्यावर उतरून मतदारांशी संवाद साधताहेत. मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यातील काही जिल्ह्यांमध्ये ‘यादव बेल्ट’ स्ट्राँग. त्यामुळे मागची पिछाडी भरून काढण्यासाठी भाजपला या ठिकाणी कडवा संघर्ष करावा लागतोय.
मुंबईहून येताहेत सातत्याने कॉल्स
बुधवारी झाशीत योगी यांच्या दौऱ्यावेळी वेगवेगळ्या ठिकाणचे पत्रकार जमलेले. बोलता-बोलता काही जणांनी सांगितले, ‘आम्हाला तुमच्या
महाराष्ट्रातून सतत कॉल्स येताहेत. बहुतांश करून मुंबईचेच असतात. तुमच्याकडच्या नेत्यांना यूपीच्या राजकारणात भलताच इंटरेस्ट दिसतोय.’ विशेष म्हणजे तिकडून कॉल करणाऱ्यांचा एक प्रश्न म्हणे हमखास ठरलेला असतो, ‘मोदीं की हवा कुछ कम हुई क्या नहीं ?