UP Election 2022: 'ए पोलीस, ए पोलिसवाल्यांनो, तुमच्यापेक्षा...!' भर सभेमध्ये अखिलेश यादवांनी अपशब्द वापरले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 07:52 PM2022-02-16T19:52:01+5:302022-02-16T19:53:12+5:30
Uttar Pradesh Election 2022: या त्यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला असून आता भाजपाच्या आरोपांना बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सपाला गुंडांचा पक्ष, उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा गुंडाराज येईल असे मतदारांना वारंवार सभांमधून सांगत आहेत. अशातच आज अखिलेश यादव यांनी सभेमध्ये भाषणावेळी पोलिसांबाबत अपशब्द उच्चारले. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
उत्तरप्रदेशच्या कन्नौजच्या तीर्वा मतदारसंघात अखिलेश यादव यांची सभा सुरु होती. यावेळी प्रचंड गर्दी झाली होती. यामुळे सभा मंडपाच्या जवळ मोठ्या प्रमाणावर लोक उभे होते. त्यांना पोलीस मागे सारत होते. यावेळी सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांची सभा सुरु होती. भाषण सुरु होते, त्यांचे लक्ष तिकडे गेले तेव्हा त्यांनी पोलिसांना चार पाच वेळा ए पोलीस, ए पोलीस असे म्हटले. यानंतर त्यांच्यावर आपत्तीजनक टिप्पणी केली.
''ए पोलीस, ए पोलीस, ए पोलिसवाल्यांनो का करताय हा तमाशा? तुमच्यापेक्षा उद्धट कोणी असू शकत नाही. हे भाजपावाले करवून घेत असतील. भाजपाने रेड कार्ड इश्यू केलेले, आठवतेय का? एका जातीच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. त्यांनी अन्याय केलेला'', असे वक्तव्य अखिलेश यांनी केले.
#WATCH | SP chief Akhilesh Yadav lashes out at Police personnel forcefully evacuating the area near the stage of his public rally in Tirwa, Kannauj. Police attempted to remove from the area, the people who were trying to enter it. pic.twitter.com/lYTpp0t0iM
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) February 16, 2022
या त्यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला असून आता भाजपाच्या आरोपांना बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे.