उत्तर प्रदेश निवडणूक; शेतकऱ्यांच्या कसोटीवर उतरणारा पक्षच जिंकणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 12:40 PM2022-02-06T12:40:41+5:302022-02-06T12:41:32+5:30
शेतकऱ्यांचे मुद्दे व त्यांची नाराजी निवडणुकीत दिसून येत आहे. अशा स्थितीत शेतकरी आंदोलनाच्या काळात सरकारचा साथ देणारे खापचे चौधरी राजेंद्र सिंह मलिक हे भाजप उमेदवाराच्या पाठीशी उभे राहिले आहेत. खापचे श्याम सिंह त्यांच्या विरोधात आहेत.
राजेंद्रकुमार -
लखनौ : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शनिवारी शामलीमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले होते. हा पश्चिम यूपीचा व्हीआयपी जिल्हा आहे. ११ वर्षांपूर्वी मायावती सरकारच्या कालावधीत हा जिल्हा अस्तित्वात आला. जिल्ह्यात कैराना, ठाणे भवन व शामली हे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. हा जिल्हा उसासाठी प्रसिद्ध आहे. जाट, मुस्लीम बाहुल्य असलेल्या या जिल्ह्यातील शेतकरी शेतीबरोबरच रिम-धुरा उद्योग करतात व तो देश-विदेशात प्रसिद्ध आहे. शामली मतदारसंघात शेतकरी हे उमेदवारांना अनेक कसोटींवर अजमावत आहेत. येथे जो शेतकऱ्यांच्या कसोटीवर उतरेल, तोच यूपी विधानसभेत पोहोचेल.
शेतकऱ्यांचे मुद्दे व त्यांची नाराजी निवडणुकीत दिसून येत आहे. अशा स्थितीत शेतकरी आंदोलनाच्या काळात सरकारचा साथ देणारे खापचे चौधरी राजेंद्र सिंह मलिक हे भाजप उमेदवाराच्या पाठीशी उभे राहिले आहेत. खापचे श्याम सिंह त्यांच्या विरोधात आहेत. शामली जागेवर भाजपसह चार पक्षांचे उमेदवार जाट आहेत.
अखिलेश-जयंत चौधरींवर टीका
संपूर्ण शामली जिल्ह्यात भाजपविरोधात वातावरण आहे. याची दखल घेऊन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ठाणे भवन जागेचा प्रचार करण्यासाठी आले होते. या जागेवर यूपीचे ऊसमंत्री सुरेश राणा निवडणूक लढवीत आहेत.
जनतेला डबल इंजिनचे दमदार सरकार आवडते. माफियांच्या मागे लपणारी दमदार सपा आवडत नाही, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. राज्यात आता बॉम्बस्फोट होत नाहीत, तर कावड यात्रा निघतात. अखिलेश यादव-जयंत चौधरी यांच्या जोडीवर टीका करताना ते म्हणाले की, हे डार्क झोनवाले आहेत.