विजेचा जीवघेणा शॉक! कनेक्शन घेऊनही 70 हजारांच्या चोरीचा आरोप; शेतकऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 05:14 PM2023-03-15T17:14:49+5:302023-03-15T17:15:51+5:30
शेतकऱ्याने वीज कनेक्शन घेतले होते. तरीही त्याच्यावर वीजचोरी केल्याचा आरोप झाला आणि त्यानंतर वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला मोठं बिल दिलं.
विजेच्या ताराच नव्हे तर कागदी बिल पाहूनही जीवघेणा झटका बसू शकतो. उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील एका शेतकऱ्यासोबत अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. तब्बल 70 हजार रुपयांचे बिल आले असून शेतकऱ्यावर वीज चोरीचा आरोप करण्यात आला आहे. वीज विभागाकडून बिल पाठवण्यात आले. शेतकऱ्याने वीज कनेक्शन घेतले होते. तरीही त्याच्यावर वीजचोरी केल्याचा आरोप झाला आणि त्यानंतर वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला मोठं बिल दिलं. बिल पाहून शेतकऱ्याला हार्ट अटॅक आला आणि त्याचा मृत्यू झाला. शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर खळबळ उडाली आहे.
बाराबंकीच्या लोनी कटरा पोलीस स्टेशन हद्दीतील भिलवाल शहरातील रहिवासी असलेल्या शेतकऱ्याचा भाऊ महेश कुमार याने मध्यांचल विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र लिहून संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे. वीज विभागात काम करणाऱ्या महेश कुमार श्रीवास्तव यांना 3000 रुपये देऊन आम्ही गेल्या वर्षी कनेक्शन घेतले असल्याचे ते सांगतात. या प्रकरणी आम्ही अनेक वेळा बिल जमा करण्याचा प्रयत्न केला. बिल न दिल्यामुळे ते जमा करता आले नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. मला चार लहान मुलं आहेत. आम्ही मजुरी करून जगतो असंही म्हटलं आहे.
महेशने सांगितलं की, मला मजुरीसाठी जावे लागते. वीज बिल न भरल्याने महेश श्रीवास्तव यांच्याशीही माझा वाद झाला. दरम्यान, 9 मार्च रोजी वीज विभागाकडून माझ्यावर वीजचोरी झाल्याचा ठपका ठेवत बिल पाठवण्यात आले आहे. मी आणि माझे संपूर्ण कुटुंब या धक्क्यात आहे. या धक्क्यातच माझ्या मोठ्या भावाचे 11 मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दोषींवर कारवाई करून त्यांना वीजचोरीच्या आरोपातून मुक्त करण्याची मागणी त्याने विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.
लोणी कटरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिलवाल शहरात राहणाऱ्या व्यक्तीने एक वर्ष दहा महिन्यांपूर्वी घरगुती वीज जोडणी केली होती. तब्बल दोन वर्षांनंतर वीज विभागाने 70 हजार रुपयांची वीजचोरीची नोटीस पाठवून दिली. नोटीस पाहताच मोठा भाऊ राकेश यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. याप्रकरणी लेखी तक्रार केली असून चौकशीनंतर कारवाईची मागणी केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"