Robbery: 70 लाखांच्या दागिने चोरी प्रकरणाला नाट्यमय वळण, पोलिसही चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 02:35 PM2022-03-08T14:35:43+5:302022-03-08T14:37:05+5:30
PNB बँकेच्या लॉकरमधून 70 लाख रुपयांचे दागिने चोरीला गेल्यानंतर पोलिसांनी तपास केला. पण, तपासातर वेगळीच माहिती समोर आली.
गाझियाबाद: उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील पीएनबी(PNB) बँकेच्या लॉकरमून चोरीला गेलेले 70 लाख रुपयांचे दागिने अखेर सापडले आहेत. नेहरु नगर येथील PNB बँकेत झालेल्या दागिन्यांच्या चोरी प्रकरणात एक अतिशय नाट्यमय बाब समोर आली आहे. बँकेतून 70 लाख रुपयांचे दागिने चोरीला गेलेच नाही, अशी माहिती समोर आली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
3 मार्च रोजी गाझियाबादच्या अशोक नगर भागात राहणाऱ्या प्रियंका गुप्ता नावाच्या महिलेचे नेहरू नगर भागातील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत गेल्या 20 वर्षांपासून खाते आहे. प्रियंका गुप्ताने आपले सर्व 70 लाख रुपयांचे दागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले होते. 2019 मध्ये तिने शेवटचे लॉकर वापरले होते. त्यानंतर डिसेंबर 2021 मध्येच लॉकर उघडण्यासाठी बँकेशी संपर्क साधला. पण तिला लॉकरची चावी सापडली नसल्याने ते उघडता आले नाही.
असा झाला खुलासा...
अखेर पोलिसांच्या मदतीने लॉकर तोडण्यात आले, पण लॉकरमध्ये दागिने नव्हते. यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासादरम्यान समजले की, महिलेने जे लॉकर तोडायला सांगितले, ते तिचे नव्हतेच. नंतर तिचे लॉकर तोडण्यात आले, त्यात महिलेचे सर्व 70 लाखांचे दागिने सुखरुप असल्याचे समजले. या प्रकरानंतर गाझियाबाद पोलिसांनी बँक अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचे सांगितले.