"सरकार मृतांचे आकडे लपवतंय, कारण..."; चेंगराचेंगरीवरून अखिलेश यादवांचे योगी सरकारवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 12:47 IST2025-01-31T12:45:00+5:302025-01-31T12:47:55+5:30

Mahakumbh Stampede Death Toll: महाकुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू झाल्याचे उत्तर प्रदेश सरकारने सांगितले आहे. पण, या आकेडवारीबद्दल अखिलेश यादव यांनी शंका व्यक्त केली आहे. याचेही कारणही त्यांनी सांगितले आहे.  

Uttar Pradesh government is hiding the death toll because it does not want to pay compensation; Akhilesh Yadav makes serious allegations on the stampede | "सरकार मृतांचे आकडे लपवतंय, कारण..."; चेंगराचेंगरीवरून अखिलेश यादवांचे योगी सरकारवर गंभीर आरोप

"सरकार मृतांचे आकडे लपवतंय, कारण..."; चेंगराचेंगरीवरून अखिलेश यादवांचे योगी सरकारवर गंभीर आरोप

Mahakumbh Stampede Death Update: महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत ३० जणांचा मृत्यू झाला आणि ६० भाविक जखमी झाले, असे उत्तर प्रदेश सरकारने सांगितले. उत्तर प्रदेश सरकारकडून देण्यात आलेल्या मृतांच्या आकडेवारीबद्दल अखिलेश यादव प्रश्न उपस्थित केले आहेत. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

२९ जानेवारी रोजी महाकुंभ मेळ्यात त्रिवेणी संगमावर अमृत स्नान करण्यासाठी निघाले होते. अचानक गर्दी वाढल्याने चेंगराचेंगरी झाली. 

अखिलेश यादव चेंगराचेंगरीबद्दल काय बोलले?

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले की, "दुर्घटनेची सत्यता, आकडे लपवणे, पुरावे लपवणे हा एक गुन्हा आहे. उत्तर प्रदेश सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर गेले आहेत, राजनैतिक रुपातही गेले आहेत. सरकारला मृतांचा आकडा लपवत आहे, कारण नुकसान भरपाई द्यावी लागू नये", असा आरोप अखिलेश यादव यांनी केला. 

"उत्तर प्रदेश सरकार सर्व माहिती लपवत आहे. सरकारला वाटतंय की, लोकांचं लक्ष विचलित व्हावं. घटनेमागे कोणतेही कटकारस्थान नाहीये. फक्त सरकारचे अपयश आहे. साधू, संत सुद्धा हेच म्हणत आहेत", अशी टीका अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेश सरकारवर केले. 

'अडकलेल्या लोकांपर्यंत मदत पोहोचवण्याची व्यवस्था करावी'
 
अखिलेश यादव यांनी म्हटले आहे की, "स्वयंसेवकांना दुचाकीच्या माध्यमातून दूरवर अडकलेल्या लोकांपर्यंत राज्यभरातून वैद्यकीय आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पोहोचवण्याची व्यवस्था केली गेली पाहिजे."

"महाकुंभ जवळच्या भागात आणि उर्वरित राज्यात शेकडो किमी वाहने अडकली आहेत. त्यांना पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा होण्याबद्दल लक्ष दिले गेले पाहिजेत. मेडिकल्स दिवस रात्र सुरू ठेवली पाहिजेत. थंडीत रस्त्यात अडकलेल्या लोकांना चादरी आणि कपड्यांचं वाटप केले गेले पाहिजे", अशा सूचना अखिलेश यादव यांनी राज्य सरकारला केल्या आहेत. 

घटना दाबण्यासाठी कोट्यवधींचा खर्च -अखिलेश यादव

"हजारो कोटी रुपये ही घटना दाबण्यासाठी आणि प्रचार करण्यासाठी खर्च केले जात आहेत. मग पीडितांसाठी काही कोटी रुपये खर्च करण्यासाठी सरकार का कचरत आहे?", असा सवालही अखिलेश यादव यांनी केला आहे. 

Web Title: Uttar Pradesh government is hiding the death toll because it does not want to pay compensation; Akhilesh Yadav makes serious allegations on the stampede

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.