निकाहावेळी नवरदेव मुस्लीम नसून हिंदू असल्याचं समजताच उडाला गोंधळ, मौलवीला आली शंका; मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 03:42 PM2021-06-14T15:42:22+5:302021-06-14T15:49:30+5:30
सोशल मिडियावर दोघांची मैत्री... दोन वर्षांपासून सुरू होते बोलणे... या काळात दोघे आणखी जवळ आले अन् मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले...
महाराजगंज - उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथे एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे एका निकाहादरम्यान मौलवीला नवरदेवाची शंकाल आली. यानंतर नवरदेवाचे खिसे तपासण्यात आले. त्यात पॅन कार्ड मिळाले. या पॅन कार्डवरून नवरदेव मुस्लीम नसून हिंदू असल्याचे समोर आले आणि एकच गोंधळ उडाला. यानंतर तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी संबंधित नवरदेवाला जबरदस्त मारहाण केली आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
सोशल मिडियावर झाली होती ओळख -
ही घटना कोल्हुई पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. गावातील संबंधित मुलीचे सिद्धार्थनगर येथील युवकाशी प्रेम प्रकरण सुरू होते. सोशल मिडियावरून या दोघांची मैत्री झाली होती. या दोघांत जवळपास दोन वर्षांपासून बोलणे होत होते. या काळात दोघे आणखी जवळ आले. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न करायचे ठरवले.
निकाह वाचताना मौलवीला आली शंका -
यानंतर तरुणीच्या कुटुंबियांनी लग्नाला परवानगी देत वरात आणण्यास सांगितले. यावर, तरुणाने कोरोना महामारीचा हवाला देत दो-चार लोकांनाच वरातीत आणण्यासंदर्भात सांगितले. यावर तरूण रविवारी निकाहासाठी पोहोचला. मौलवींनी निकाह वाचायला सुरुवातही केली. याच वेळी उर्दूचे काही शब्द बोलताना तरूण गडबडला. यानंतर मौलवीला त्याची शंका आली. यावर नवरदेव तरुणाची झडती घेतल्यानंतर त्याच्या खिशात पॅनकार्ड सापडले. यावरूनच मुलगा मुस्लीम नसल्याचे समोर आले. हा प्रकार समोर आल्यानंतर तेथे प्रचंड गोंधळ उडाला आणि तेथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी नवरदेवाला जबर मारहाण केली आणि हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले.
Love Story : 10वी नापास रिक्षावाला प्रेमात पोहोचला स्वित्झर्लंडला! फिल्मी आहे संपूर्ण स्टोरी
नवरदेवाची चौकशी -
यासंदर्भात बोलताना पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दिलीप शुक्ला म्हणाले, नवरदेवासह वरतीतील लोकांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली जात आहे. दोन्ही पक्षांची बोलणी सुरू आहे. मुलगा मुस्लीम नसल्याचे मुलीला आधीच माहीत होते. निकाह करवणाऱ्या मोलवीला यासंदर्भात माहिती नव्हती. यामुळे गोंधळ उडाला. पीडित पक्षाने तक्रार दिल्यास गुन्हा नोंदवून कारवाई केली जाईल.