उत्तर प्रदेशात सर्वाधिक महिला अत्याचार अन् हत्येची प्रकरणं; महाराष्ट्राचा नंबर कितवा?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 12:01 AM2023-07-27T00:01:58+5:302023-07-27T00:04:34+5:30

मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यानंतर आता देशातील आकडेवारी समोर आली आहे

Uttar Pradesh has the highest number of cases of rape and murder of women; What is the number of Maharashtra? | उत्तर प्रदेशात सर्वाधिक महिला अत्याचार अन् हत्येची प्रकरणं; महाराष्ट्राचा नंबर कितवा?

उत्तर प्रदेशात सर्वाधिक महिला अत्याचार अन् हत्येची प्रकरणं; महाराष्ट्राचा नंबर कितवा?

googlenewsNext

Manipur Violence, Woman Safety in India: मणिपूरमध्ये दोन महिलांसोबत झालेल्या अत्याचाराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधक सरकारवर हल्लाबोल करत आहेत. मणिपूरमधील परिस्थितीवर संसदेत दीर्घ चर्चा व्हावी आणि पंतप्रधानांकडून निवदेन देण्यात यावे, अशी मागणी ते करत आहेत. तर दुसरीकडे ही मागणी राजकीय हेतूने प्रेरित असल्याची मागणी भाजपाचे नेतेमंडळी करत आहेत. तसेच, मणिपूरची चर्चा झाली तर बंगाल आणि राजस्थानमध्येही महिलांवरील अत्याचाराची चर्चा होईल असेही भाजपाकडून सांगितले जात आहे. याच दरम्यान महिला सुरक्षेसंदर्भात एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

मणिपूरमध्ये भाजपची सत्ता आहे, तर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. भाजप आणि विरोधकांमधील गदारोळात महिलांसोबत होणाऱ्या अत्याचाराच्या प्रश्नावर खासदारांच्या प्रश्नांचे उत्तर सरकारकडून आले. त्यात बलात्कारानंतर हत्या किंवा सामूहिक बलात्काराची प्रकरणे वाढल्याचे समोर आले. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी लोकसभा खासदारांच्या लेखी उत्तरात सांगितले की, 2017 ते 2021 या कालावधीत 28 राज्यांमध्ये महिलांवर बलात्कार किंवा सामूहिक बलात्कारानंतर हत्या झाल्याची 1278 प्रकरणे नोंदवण्यात आली. यामध्ये उत्तर प्रदेश पहिल्या तर आसाम दुसऱ्या क्रमांकावर आहे.

कुठल्या राज्यात काय स्थिती?

उत्तर प्रदेशात सर्वाधिक 218 आणि आसाममध्ये 191 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर मध्य प्रदेश, महाराष्ट्र आहेत जेथे अनुक्रमे 166 आणि 133 गुन्हे नोंदवले गेले आहेत. ही आकडेवारी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी २५ जुलै रोजी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात मांडली. 2017 ते 2021 या काळात भाजपने उत्तर प्रदेश आणि आसाममध्ये संपूर्ण काळ सत्ता ठेवली.

बंगाल, राजस्थान आणि छत्तीसगडची स्थिती

या कालावधीत राजस्थानमध्ये बलात्कार किंवा सामूहिक बलात्काराच्या 39 गुन्ह्यांची नोंद झाली, तर छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमध्ये या कालावधीत अनुक्रमे 32 आणि 30 गुन्हे नोंदवले गेले.

Web Title: Uttar Pradesh has the highest number of cases of rape and murder of women; What is the number of Maharashtra?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.