Owaisi Convoy Attack : ओवेसींच्या गाडीवर कशी झाली फायरिंग? AIMIM प्रमुखांनी स्वतःच सांगितली कटाची संपूर्ण कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 10:36 AM2022-02-04T10:36:16+5:302022-02-04T10:36:51+5:30

एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या वाहनावर गुरुवारी दिल्ली -लखनऊ एक्स्प्रेस वेवरील छिजारसी टोल प्लाझा येथे दोन जणांनी अचानक गोळीबार ...

Uttar pradesh How attacked on AIMIM chief Asaduddin Owaisi car, know here  | Owaisi Convoy Attack : ओवेसींच्या गाडीवर कशी झाली फायरिंग? AIMIM प्रमुखांनी स्वतःच सांगितली कटाची संपूर्ण कहाणी

Owaisi Convoy Attack : ओवेसींच्या गाडीवर कशी झाली फायरिंग? AIMIM प्रमुखांनी स्वतःच सांगितली कटाची संपूर्ण कहाणी

Next

एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या वाहनावर गुरुवारी दिल्ली-लखनऊ एक्स्प्रेस वेवरील छिजारसी टोल प्लाझा येथे दोन जणांनी अचानक गोळीबार केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस तात्काळ सक्रिय झाले. ओवेसी यांनी स्वत: ट्विट करून या संदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितले की, तीन-चार जणांनी त्याच्या गाडीवर गोळीबार केला. मात्र, सर्वजण सुखरूप असून त्यांचा ताफा तेथून पुढे गेला.  येथे गोळीबार करणाऱ्या सचिन आणि शुभम या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ओवेसी म्हणाले, हे सर्व कट रचून करण्यात आले आहे. यासोबतच या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणीही त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. (Asaduddin Owaisi Convoy Attacked)

या संपूर्ण घटनेनंतर दिल्लीत पोहोचलेल्या असदुद्दीन ओवेसी यांनी घटनेचा संपूर्ण वृत्तांत सांगितला. त्यांनी सांगितले की, मिरत आणि किठोर येथे त्यांचा रोड शो होता. तेथून परतत असताना त्यांच्या कारवर अचानक गोळ्या झाडण्यात आल्या. यानंतर त्यांची कार तेथून भरधाव वेगाने पुढे गेली. यावेळी आपण दोन लोकांना बघितले, यांपैकी एकाने लाल रंगाचे कपडे घातलेले होते. तर दुसर्‍याने पांढऱ्या रंगाचे जाकीट परिधान केलेले होते, असेही ओवेसींनी सांगितले.

ओवेसी पुढे म्हणाले, दोन-तीन किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर त्यांच्या गाडीचे टायर पंक्चर झाले आणि ते तत्काळ दुसऱ्या कारमध्ये बसले. यानंतर ते एएसपींशी बोलले. यावर, अतिरिक्त एसपींनी एकाला ताब्यात घेतल्याचे आणि संबंधित शस्त्रही जप्त केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या गाडीवर तीन गोळ्यांच्या खुणा असल्याचेही ते म्हणाले.

या घटनेनंतर हापूडचे एसपी दीपक भुकर म्हणाले, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी करण्यात येत आहे. तर यूपीचे एडीजी कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनी सांगितले की, असदुद्दीन ओवेसी यांच्या ट्विटरवर हल्ल्याची माहिती येताच पोलीसही पूर्णपणे सक्रिय झाले आहेत.

Web Title: Uttar pradesh How attacked on AIMIM chief Asaduddin Owaisi car, know here 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.