37 वर्षांपासून ना अंघोळ ना दात घासले; भारतामध्येही आहे अंघोळ न करणारा 'अंघोळ्या'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 05:33 PM2022-10-26T17:33:43+5:302022-10-26T17:34:41+5:30

दोन दिवसांपूर्वीच 50 वर्षांपासून अंघोळ न करणाऱ्या अमो हाजी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर भारतातील या व्यक्तीची चर्चा होत आहे.

uttar pradesh | kailash singh kalau from varanasi may replace amou haji as world dirtiest man | 37 वर्षांपासून ना अंघोळ ना दात घासले; भारतामध्येही आहे अंघोळ न करणारा 'अंघोळ्या'

37 वर्षांपासून ना अंघोळ ना दात घासले; भारतामध्येही आहे अंघोळ न करणारा 'अंघोळ्या'

Next


जगातील सर्वात घाणेरडा माणूस म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या व्यक्तीचा वयाच्या 94 व्या वर्षी मृत्यू झाला. जवळपास पाच दशकांनी अंघोळ करणाऱ्या या व्यक्तीचा अंघोळीनंतर काही महिन्यांतच मृत्यू झाला. त्याने जवळपास 50 वर्षांहून अधिक काळ पाणी आणि साबनाचा वापर केला नव्हता. अमो हाजी असे त्यांचे नाव असून, ते इराणचे रहिवासी होते. अंघोळ केल्यावर मरेल, असे अमो हाजी म्हणायचे. विशेष म्हणजे, अंघोळ न करणारे अमो हाजी एकटेच नव्हते. भारतातही असा एक व्यक्ती आहे, जो जगातील सर्वात घाणेरडे माणूस म्हणून ओळख मिळवू शकतो.

35 वर्षांपासून आंघोळ किंवा ब्रश नाही
इराणच्या अमो हाजीनंतर सर्वात घाणेरडा व्यक्ती म्हणून ओळख मिळवणारा व्यक्ती भारतात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसीच्या जवळील एका गावात राहणारे कैलाश सिंह यांनी गेल्या 37 वर्षांपासून ना अंघोळ केली आहे ना दात घासले आहेत. देशातील सर्व समस्या संपुष्टात याव्यात, यासाठी त्यांनी आंघोळ न करण्याचा पवित्रा घेतला असल्याचे ते सांगतात. पाण्याऐवजी अग्नी स्नान केल्याने शरीरातील सर्व जंतू आणि संसर्ग नष्ट होतात, असे कैलाश सिंह यांचे मत आहे.

कैलास अग्निस्नान करतात

कैलाश सिंहच्या म्हणण्यानुसार, देशावरील प्रेमापोटी ते आंघोळ करत नाही, तर शेजाऱ्यांचे म्हणणे आहे की, कैलास सिंह यांना सात मुली असल्याने मुलाच्या इच्छेने हे करत आहेत. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, दररोज संध्याकाळी कैलास सिंह आग लावतात आणि एका पायावर उभे राहून गांजा पितात आणि भगवान शिवाची पूजा करतात.

वर्षभर दोन स्वेटर घाला, गरम पाणी प्या

कैलाश सिंग वर्षभर दोन स्वेटर घालतात आणि अग्नीस्नान करतात. तसेच, ते पिण्यासाठी फक्त गरम पाणी घेतात. भावाच्या मृत्यूनंतरही कैलास सिंह यांनी गंगेत स्नान करण्यास नकार दिला होता. कैलाश सिंह सांगतात की, त्यांनी 35 वर्षांपासून पाण्याने आंघोळ केलेली नाही. ते किराणा दुकान चालवत होते, पण त्यांच्या अशुद्ध सवयींमुळे त्यांच्या दुकानात ग्राहक येत नव्हते, त्यानंतर ते शेती करून जगत आहे.
 

Web Title: uttar pradesh | kailash singh kalau from varanasi may replace amou haji as world dirtiest man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.