Uttar Pradesh Loudspeaker: CM योगींचा आदेश; 45 हजार लाउडस्पीकर हटवले, 58 हजारांचा आवाज झाला कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 10:28 AM2022-04-30T10:28:16+5:302022-04-30T10:28:25+5:30

Loudspeaker: लाऊडस्पीकर वादाचे पडसाद महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेशातही दिसू लागले आहेत.

Uttar Pradesh Loudspeaker: Order of CM Yogi; 45,000 loudspeakers removed, 58,000 less noise | Uttar Pradesh Loudspeaker: CM योगींचा आदेश; 45 हजार लाउडस्पीकर हटवले, 58 हजारांचा आवाज झाला कमी

Uttar Pradesh Loudspeaker: CM योगींचा आदेश; 45 हजार लाउडस्पीकर हटवले, 58 हजारांचा आवाज झाला कमी

Next

Uttar Pradesh Loudspeaker: लाऊडस्पीकर वादाचे पडसाद महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेशातही दिसू लागले आहेत. मशीद आणि मंदिरांवरील अवैध लाऊडस्पीकर आणि आवाजाच्या तीव्रतेसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अनेक मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. तसेच, परवानगी नसलेले लाऊडस्पीकर काढण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आतापर्यंत युपीतील धार्मिक स्थळांवरून 45 हजारांहून अधिक लाऊडस्पीकर हटवण्यात आले आहेत.

या संदर्भात 23 एप्रिल रोजी आदेशाची अधिसूचनाही जारी करण्यात आली होती, त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. यूपीच्या विविध जिल्ह्यांमध्ये सातत्याने मोहीम राबवून धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवले जात आहेत. 45 हजार लाऊडस्पीकर हटवण्यासोबतच इतर 58 हजार लाऊडस्पीकरचा आवाजही कमी करण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश
सुप्रीम कोर्टाने ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी अंमलबजावणी सुरू आहे. बिहारमध्येही राजकारण तापले आहे. काही धर्माचे लोक याला विरोध करत आहेत. दरम्यान, गुरुद्वारा व्यवस्थापनाने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. गुरुद्वाराच्या घुमटावरील मोठा लाऊडस्पीकर व्यवस्थापनाने काढून टाकला आहे. या स्पीकरवरून चौक पोलीस ठाण्याव्यतिरिक्त चांदोरिया, चौक व परिसरातील अनेक भागात गुरुवाणीचा आवाज पोहोचत असे. पण आता गुरुवाणी फक्त गुरुद्वारा कॅम्पसमध्येच ऐकायला मिळते.

Web Title: Uttar Pradesh Loudspeaker: Order of CM Yogi; 45,000 loudspeakers removed, 58,000 less noise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.