लखनौ : रिफिलिंगदरम्यान ऑक्सिजन सिलेंडरचा भीषण स्फोट; तिघांचा मृत्यू, पाच गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 06:48 PM2021-05-05T18:48:11+5:302021-05-05T18:48:56+5:30

मिळालेल्या माहितीनुसार, चिनहट येथील केटी वेल्डिंग स्टोर ऑक्सिजन प्लांटमध्ये दुपारी 3 वाजताच्या सुमारास जम्बो सिलेंडरमध्ये रिफिलिंग करताना भीषण स्फोट झाला.

Uttar Pradesh Lucknow blast at oxygen refiling plant 3 diedd 5 injured | लखनौ : रिफिलिंगदरम्यान ऑक्सिजन सिलेंडरचा भीषण स्फोट; तिघांचा मृत्यू, पाच गंभीर

लखनौ : रिफिलिंगदरम्यान ऑक्सिजन सिलेंडरचा भीषण स्फोट; तिघांचा मृत्यू, पाच गंभीर

Next

लखनौ - उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे मोठी घटना घडली आहे. येथे रिफिलिंगदरम्यान ऑक्सिजन सिलेंडर फुटल्याने तिघांचा मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाल्याचे समजते. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे. हा अपघात चिनहटच्या केटी ऑक्सिजन प्लांटमध्ये घडला. (Uttar Pradesh Lucknow blast at oxygen refiling plant 3 diedd 5 injured)

मिळालेल्या माहितीनुसार, चिनहट येथील केटी वेल्डिंग स्टोर ऑक्सिजन प्लांटमध्ये दुपारी 3 वाजताच्या सुमारास जम्बो सिलेंडरमध्ये रिफिलिंग करताना भीषण स्फोट झाला. या स्फोटात प्लांटमध्ये असलेल्या तिघांचा मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त डीके ठाकूर आणि जिल्हाधिकारी अभिषेक प्रकाश यांच्यासह इतर काही अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून चौकशीचे आदेश दिले आहेत. 

अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकून ऑक्सिजन येणार नाही, जरा मुंबईकडून शिका... SC नं केंद्राला फटकारलं

प्लांटचं छतही उडालं -
हा स्फोट एवढा भयंकर होता, की प्लांटचे छतही उडाले. अद्यात मृत आणि जखमी कोण, यासंदर्भात माहिती मिळालेली नाही. डीएम यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व मृत व्यक्ती आणि जमी प्लांटमध्ये  काम करणारे कामगारच आहेत. तर पोलीस काही बाहेरील लोकांसंदर्भातही शंका व्यक्त करत आहेत. फॉरेंसिक टीम आणि डॉग स्क्वॅड प्लांटमध्ये पोहोचून स्फोटाचा तपास करत आहेत.

यापूर्वी उत्तर प्रदेशातील कानपूरच्या पनकी ऑक्सिजन प्लांटमध्ये रिफिलिंगदरम्यान स्फोट झाला होता. यात एका मजुराचा मृत्यू झाला होता, तर 2 जण जखमी झाले होते. दादा नगर औद्योगिक वसाहतीत असलेल्या या पनकी गॅस प्लांटमध्ये किदवई नगरातील एका रुग्णालयातील व्यक्ती गॅस भरण्यासाठी आला होता.

Covid-19 second wave: हार्ट अ‍ॅटॅकमुळे का होतोय कोरोना बाधितांचा मृत्यू? जाणून घ्या, लक्षणं आणि उपचार

गेल्या 24 तासांत देशात 3,82,315 नवे रुग्ण -
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 3,82,315 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,780 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 2,06,65,148 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 2,26,188 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. बुधवारी (5 मे) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3 लाख 82 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल दोन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा दोन लाखांवर पोहोचला आहे. 
 

 

Web Title: Uttar Pradesh Lucknow blast at oxygen refiling plant 3 diedd 5 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.