हापूड येथे मोठा अपघात, केमिकल फॅक्ट्रीत बॉयलर फुटला; 8 मजुरांचा होरपळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 06:06 PM2022-06-04T18:06:19+5:302022-06-04T18:08:22+5:30
जिल्ह्यातील धौलाना भागात यूपीआयडीची फॅक्ट्री आहे. या फॅक्ट्रीमध्ये केमिकल तयार होते. येथे शनिवारी दुपारच्या सुमारास अचानकपणे बॉयलर फुटले.
उत्तर प्रदेशातील हापूड येथे शनिवारी भीषण अपघात घडला. येथे एका केमिकल फॅक्ट्रीत बॉयलर पुठल्याने मोठी आग लागली. बॉयलरच्या जबरदस्त ब्लासमुळे लागलेल्या या आगीने विक्राळ रुप धारण केले होते. यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. या अपघातात आठ मजुरांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 15 जर गंभीर रित्या भाजले आहेत. घठनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घठना स्थळी पोहोचले आहेत. तसेच या फॅक्ट्रीमध्ये बचावकार्यहीसुरू आहे.
जिल्ह्यातील धौलाना भागात यूपीआयडीची फॅक्ट्री आहे. या फॅक्ट्रीमध्ये केमिकल तयार होते. येथे शनिवारी दुपारच्या सुमारास अचानकपणे बॉयलर फुटले. यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर आग लागली आणि बघता बघता तिने विक्राळ रूप धारण केले.
आगीचे विक्राळ रुप पाहून परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अपघातावेळी कारखान्यात सुमारे 25 कामगार काम करत होते. या अपघातात आठ मजूर जिवंत जळाले, तर 15 मजूर गंभीररीत्या भाजले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले. ते शर्थीने आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत.