पंतप्रधान मोदींनी जिममध्ये दाखवला 'फिटनेस'; लोक बघतच राहिले, पाहा - Video
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 03:26 PM2022-01-02T15:26:31+5:302022-01-02T15:28:43+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी केली. तसेच येथे असलेल्या जिमला पंतप्रधानांनी भेट दिली आणि व्यायामही केला.
मिरत - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशातील मिरत दौऱ्यावर आहेत. येथे पंतप्रधान मोदींनी मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी केली. तत्पूर्वी, पंतप्रधान येथे असलेल्या क्रीडा संकुलात पोहोचले. येथे असलेल्या जिमला पंतप्रधानांनी भेट दिली आणि स्वत: जिममध्ये व्यायामही केला. पीएम मोदी सर्वप्रथम येथील जिममध्ये पोहोचले आणि तेथील मशीन्सचा त्यांनी आढावा घेतला. येथे त्यानी फिटनेस इक्विपमेंट Body Wait latpull machine मशीनवर एक्रसाइज केली. यामुळे शरीराचे स्नायू मजबूत होतात. मशीनवर बसल्यानंतर पीएम मोदींनी सलग 15 वेळा हे मशीन एकापाठोपाठ एक खेचले.
हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, या व्यायामाने खांदे मजबूत होतात. यानंतर पीएम मोदींनी जिममधील सर्व मशीन्सचा आढावा घेतला. मोदी नेहमीच देशवासीयांसोबत फिटनेसंदर्भात बोलत असतात. पीएम मोदींनी 29 ऑगस्ट 2019 रोजी फिट इंडिया मिशन लाँच केले होते. यामाध्यमांनी त्यांनी देशातील नागरिकांना आपल्या दैनंदिन जीवनात फिटनेसचा समावेश करण्याचे आवाहन केले होते.
सशक्त, समृद्ध एवं स्वस्थ भारत की नींव हमारे यशस्वी प्रधानमंत्री श्री @NarendraModi जी।
— Sambit Patra (@sambitswaraj) January 2, 2022
Hon'ble PM Shri @NarendraModi Ji using fitness equipment at the venue of Sports University. #खेलेगा_यूपी_बढ़ेगा_यूपीpic.twitter.com/cxbMYgx5gR
स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीच्या पायाभरणी समारंभ प्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले, स्वतंत्र भारताला नवी दिशा देण्यात मेरठ आणि आसपासच्या प्रदेशाचे मोठे योगदान आहे. देशाच्या रक्षणासाठी सीमेवरचे बलिदान असो किंवा क्रीडांगणातील राष्ट्राचा सन्मान असो, या भागाने देशभक्तीची ज्योत नेहमीच तेवत ठेवली आहे. पंतप्रधान म्हणाले, पूर्वीच्या सरकारांमध्ये यूपीमध्ये गुन्हेगार त्यांचा खेळ खेळायचे, माफिया त्यांचा खेळ खेळायचे. पूर्वी अवैध धंद्यांचे टोर्नामेंट चालायचे, मुलींवर टिप्पण्या करणारे बिनधास्त फिरायचे. पण आता काळ बदलला आहे.