भयंकर, भयानक, भयावह! गंगा नदीच्या किनारी वाळूत पुरण्यात आले शेकडो मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 02:58 PM2021-05-16T14:58:07+5:302021-05-16T15:11:44+5:30
मृतांची संख्या वाढल्यानं लाकडांची टंचाई; अग्नी देण्याऐवजी मृतदेह वाळूत पुरण्याची वेळ
प्रयागराज: देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र अनेक राज्यांमधील परिस्थिती अद्यापही नियंत्रणाबाहेर आहे. आरोग्य यंत्रणा कोलमडल्यानं रुग्णांचे हाल होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. उपचार मिळत नसल्यानं रुग्णांचे हाल सुरू आहेत. कोरोनामुळे मृत पावल्यानंतरही हालअपेष्टा काही संपताना दिसत नाही. उत्तर प्रदेशात कोरोनामुळे अतिशय भयावह परिस्थिती पाहायला मिळत आहे.
डोळ्यांदेखत रुग्ण जीव सोडताहेत अन् आम्ही हतबलपणे पाहतोय; डॉक्टरांना अश्रू अनावर
उन्नाव, कनौज, कानपूर, रायबरेली यांच्या पाठोपाठ आता संगमनगरी अशी ओळख असलेल्या प्रयागराजमध्ये असलेल्या गंगा नदीच्या तिरावर अनेक मृतदेह पुरण्यात आले आहेत. गेल्या दीड महिन्यांत नदीच्या किनाऱ्यावर शेकडो मृतदेह पुरले गेले आहेत. अजूनही दररोज नदी किनारी असलेल्या वाळूत मृतदेह पुरले जात आहेत. मृतदेह पुरले गेल्यानंतर त्याच्या चारही बाजूंनी बांबू उभारण्यात येत आहेत. मृतदेह पुरण्यात आल्याचं इतरांना समजावं यासाठी त्याच्या बाजूला बांबू लावण्यात आले आहेत.
रस्त्यावर रुग्णवाहिका हलताना दिसली; पोलिसांना बोलावताच लज्जास्पद प्रकार समोर
हिंदू धर्मात मृतदेहांना अग्नी दिला जातो. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये उत्तर प्रदेशातील मृतांचा आकडा झपाट्यानं वाढला आहे. त्यामुळे काही भागांत अंत्यविधीसाठी लाकडंदेखील मिळत नाहीत. प्रयागरासोबतच प्रतापगड, सुलतानपूर आणि फैजाबादमध्ये मृतांचा आकडा वाढला आहे. या ठिकाणी दिवसाला ५० ते ६० जणांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. एप्रिल महिन्यात श्रृंगवेरपुर घाटात दररोज शेकडो जणांवर अंत्यसंस्कार केले जात होते. लाकडांची टंचाई जाणवू लागल्यानं कंत्राटदारांनी लोकांकडून जास्त पैसे घेण्यास सुरुवात केवी. त्यामुळे लोकांनी मृतदेहांना अग्नी देण्याऐवजी ते पुरण्यास सुरुवात केली.