उत्तर प्रदेशात मोदी लाट कायम, अयोध्या-आग्र्यात भाजपाची बाजी, तर मेरठ-अलिगडमध्ये बसपाचा वरचष्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2017 04:42 PM2017-12-01T16:42:39+5:302017-12-01T23:09:06+5:30

लखनऊ- उत्तर प्रदेश स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जादू कायम आहे.

Uttar Pradesh municipal election results - BJP's victory in Ayodhya and Agra, and BSP's Varachshma in Meerut-Aligarh | उत्तर प्रदेशात मोदी लाट कायम, अयोध्या-आग्र्यात भाजपाची बाजी, तर मेरठ-अलिगडमध्ये बसपाचा वरचष्मा

उत्तर प्रदेशात मोदी लाट कायम, अयोध्या-आग्र्यात भाजपाची बाजी, तर मेरठ-अलिगडमध्ये बसपाचा वरचष्मा

Next

लखनऊ- उत्तर प्रदेश स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जादू कायम आहे. महापौरपदाच्या 16 जागांपैकी अयोध्या आणि आग्र्यातील जागेवर भाजपाचा कब्जा केला आहे, तर इतर 12 जागांवर भाजपानं विजय मिळवला आहे आहे. बीएसपीनं अलिगड आणि मेरठमध्ये मोठ्या मताधिक्क्यानं विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजपानं एकूण 14 जागांवर विजय संपादन करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दबदबा कायम ठेवला आहे.

गोरखपूरमधल्या वॉर्ड क्रमांक 68च्या भाजपा उमेदवार माया त्रिपाठी निवडणुकीत पराभूत झाल्या आहेत. या जागेवरून अपक्ष उमेदवार नादिर यांचा विजय झाला आहे. या वॉर्डातच गोरखनाथ मंदिर आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीत भाजपाला विजय मिळाला आहे. नगर पंचायत निवडणुकीतही भाजपाच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. पहिल्यांदाच चार नगरपालिकेत कमळ उमललं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगी आदित्यनाथ यांचंही अभिनंदन केलं आहे. या निकालांमध्ये मिळालेल्या घवघवीत यशानंतर  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. देशात खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा विकास विजयी झाला आहे. उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील विजय हा नोटाबंदी आणि जीएसटीचा अपप्रचार करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर आहे. केंद्र सरकारच्या निर्णयांना विरोध करणाऱ्यांची तोंडे आता तरी नक्कीच बंद होतील, असंही मोदी म्हणाले आहेत. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळालेल्या विजयांमुळे तिथे महापौरही भाजपचाच बसणार आहे. 



फिरोजाबाद महापालिकेतही पहिल्यांदाच भाजपाचे नूतन राठोड यांनी विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे एमआयएमनं या निवडणुकीत खातं उघडलं आहे. उत्तर प्रदेश पालिका निवडणुकीत 22, 26 आणि 29 नोव्हेंबर रोजी मतदान झालं होतं. या पालिकेत 16 महापालिका, 198 नगरपालिका, 438 नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान झालं होतं. 

Web Title: Uttar Pradesh municipal election results - BJP's victory in Ayodhya and Agra, and BSP's Varachshma in Meerut-Aligarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.