Video: महाराष्ट्राचे मंत्री नितीन राऊत यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 12:29 PM2020-08-20T12:29:57+5:302020-08-20T15:54:33+5:30
Utter Pradesh Police Detained Maharashtra Minister Nitin Raut : नितीन राऊत हे आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर होते.
उत्तर प्रदेशातील जिल्हा आझमगड येथील बांसा गाव येथील दलित सरपंच सत्यमेव जयते उर्फ पप्पू राम यांची गोळी मारून क्रूर हत्या करण्यात आली. उत्तर प्रदेशातील दलितांच्या या वाढत्या हल्ल्याची गंभीर दखल अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने घेतली आहे. यासाठी या विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत हे आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर होते. मात्र दौऱ्यावर असताना आझमगडच्या बॉर्डर वर उत्तर प्रदेशमधील पोलिसांनी नितीन राऊत यांना रोखलं आहे.
Video: महाराष्ट्राचे मंत्री नितीन राऊत यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखलं https://t.co/l0OGYaCZPb@NitinRaut_INC@INCIndia
— Lokmat (@MiLOKMAT) August 20, 2020
नितीन राऊत यांना आजमगड सीमा भागात उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखून धरले आहे. आजमगड येथे सीमेवर पोलिसांनी त्यांना अडवलं आहे. पोलिसांनी अडवल्यानंतर नितीन राऊत यांनी तिथेच रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. नितीन राऊत यांच्यासह कार्यकर्ते रस्त्यावर ठिय्या मांडून आहे.