उत्तर प्रदेशात पोलीस उपनिरीक्षकाची गळा चिरून हत्या

By admin | Published: July 1, 2017 01:19 PM2017-07-01T13:19:34+5:302017-07-01T13:19:34+5:30

शुक्रवारी रात्री काही अज्ञात हल्लेखोरांनी बिजनौर पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक शहजोर सिंह मलिक यांची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

In Uttar Pradesh, the police sub-inspector threw his throat and murdered him | उत्तर प्रदेशात पोलीस उपनिरीक्षकाची गळा चिरून हत्या

उत्तर प्रदेशात पोलीस उपनिरीक्षकाची गळा चिरून हत्या

Next

ऑनलाइन लोकमत

बिजनौर, दि. 1- जम्मू-काश्मीरमध्ये जमावानं मशिदीबाहेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची बेदम मारहाण करून हत्या केल्याची घटना ताजी असताना तशीच घटना उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये घडली आहे. शुक्रवारी रात्री काही अज्ञात हल्लेखोरांनी बिजनौर पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक शहजोर सिंह मलिक यांची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इतकंच नाही, तर त्यांचा मृतदेह जवळच्याच शेतात फेकून त्यांची बंदुक घेऊन हल्लेखोर तिथून पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक शहजोर सिंह मलिक मंडावर पोलीस स्टेशनमधून बालावली पोलीस स्टेशनकडे जात असताना हा प्रकार घडला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे. तेथिल स्थानिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती.  उप निरीक्षक मलिक बालावाली पोलीस स्टेशनचे इन्चार्ज होते. गेल्या एक वर्षापासून त्या पोलीस स्टेशनमध्ये ते कार्यरत होते. 
 
एका बंद पडलेल्या काचेच्या फॅक्ट्रीजवळ त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आल्याचीही माहिती समोर येते आहे. तसंच शहजोर सिंह यांच्या मृतदेहावर अनेक जखमा आहेत. तसंच त्यांची बोटांवर कापण्याच्या खुणा आहेत. घटनास्थळाजवळून जाणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने एक मृतदेह शेतात पडला आहे, अशी माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच तातडीने पंचनामा केला.  मलिक यांची हत्या नेमकी का करण्यात आली, याचं कारण अजूनही समजलं नसल्याची माहिती बिजनौरचे एसपी अतुल शर्मा यांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी काही जणांना ताब्यात घेण्यात आलं असून चौकशी सुरू झाली आहे. आरोपींना लवकरच पकडलं जाइल, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे. 
 
योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये उत्तरप्रदेशात गुन्ह्यांचं प्रमाण वाढल्याचं बोललं जातं आहे.  गेल्या वर्षीच्या आणि यावर्षी एप्रिल ते मे महिन्याच्या तुलनेत गुन्ह्यांमध्ये १९५ टक्क्यांनी वाढ झाली आहे, असंही बोललं जातं आहे. 
 
आणखी वाचा :
 

जम्मू-काश्मीरमध्ये मशिदीबाहेर जमावाकडून पोलीस अधिकाऱ्याची बेदम मारहाण करून हत्या

 
 
 
पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाढ होते आहे. याआधी श्रीनगरमध्ये रमजानच्या काळात एका पोलीस अधिकाऱ्याची जमावाने हत्या केली होती. पोलीस अधिकारी मशिदीचा फोटो काढत असल्याचा जमावाचा गैरसमज झाला होता त्यातूनच त्यांची हत्या झाली होती. 
 

Web Title: In Uttar Pradesh, the police sub-inspector threw his throat and murdered him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.