Uttar Pradesh: निवडणूक संपताच इन्कम टॅक्सची 'रेड', युपीत माजी चेअरमनच्या घरावर छापेमारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 08:20 PM2022-03-08T20:20:00+5:302022-03-08T20:20:37+5:30

अब्दुल वाहिद यांचा एक्स्पोर्ट इंपोर्टचा मोठा कारभार आहे.

Uttar Pradesh: Raid on former chairman's house in Red, UP after election | Uttar Pradesh: निवडणूक संपताच इन्कम टॅक्सची 'रेड', युपीत माजी चेअरमनच्या घरावर छापेमारी

Uttar Pradesh: निवडणूक संपताच इन्कम टॅक्सची 'रेड', युपीत माजी चेअरमनच्या घरावर छापेमारी

googlenewsNext

बहराइच - उत्तर प्रदेशच्या बहराइच येथील नगरपालिकेचे माजी अध्यक्ष आणि एक्सपोर्ट इंपोर्ट व्यापारी अब्दुल वाहीद यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. आयकर पथकाने त्यांच्या घर, बँक आणि कार्यालयावरही धाड टाकली. या छापेमारीत सापडलेल्या दस्तावेजांची सखोल तपासणी करण्यात येत आहे. माजी नगराध्यक्षांच्या घरावरच आयकर विभागाची रेड पडल्याने शहारात एकच खळबळ उडाली आहे. तसेच, या छापेमारीचं नेमकं कारण काय, हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना लागली आहे. 

अब्दुल वाहिद यांचा एक्स्पोर्ट इंपोर्टचा मोठा कारभार आहे. नेपाळपासून जवळचा प्रदेश असल्याने असा अंदाजा लावण्यात येत आहे की, अब्दुल वाहिद यांचा व्यापार विदेशातही पसरला आहे. अद्याप या छापेमारीबद्दल आयकर विभागाच्या कुठल्याही अधिकाऱ्याने अधिकृतपणे काहीच माहिती दिली नाही. संपूर्ण गोपनियतेपणे ही कारवाई होत आहे. तपास झाल्यानंतरच ही स्थिती पूर्णपणे लक्षात येईल. 

वाहिद यांनी 2017 मध्ये बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर नानपारा येथून आमदारकीची निवडणूक लढवली होती. त्यामध्ये, ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. यावर्षी बसपाला सोडून ते सायकलीवर बसले होते. समाजवादी पक्षासाठी मोठ्या दिमतीने काम करत होते. राजकीय द्वेषभावनेतूनच ही छापेमारी होत असल्याची चर्चा परिसरात होत आहे. सध्या आयकर विभागाकडून त्यांच्या सर्वच कागदपत्रांची छापेमारी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे जवळील बँकेतून नोटा मोजण्याची मशिन मागविण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, सध्या वाहिद यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी जमली असून लोक आक्रोश व्यक्त करत आहेत. 
 

Web Title: Uttar Pradesh: Raid on former chairman's house in Red, UP after election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.