विजेचा कहर...! वीज कोसळल्यानं उत्तर प्रदेशात 41 जणांचा मृत्यू, राजस्थानात 20 जण दगावले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 08:27 AM2021-07-12T08:27:52+5:302021-07-12T08:28:52+5:30
Sky lightning death toll : उत्तर प्रदेशातच वेगवेगळ्या जिल्ह्यांत वीज कोसळ्याने 41 जणांचा मृत्यू झाला. यातीस सर्वाधिक मृतांची नोंद प्रयागराज (Prayagraj) जिल्ह्यात झाली.
नवी दिल्ली - उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि राजस्थानात (Rajasthan) वीज कोसळल्याने (Lightning) जवळपास 61 जणांचा मृत्यू झाला आहे. एकट्या उत्तर प्रदेशातच वेगवेगळ्या जिल्ह्यांत वीज कोसळ्याने 41 जणांचा मृत्यू झाला. यातीस सर्वाधिक मृतांची नोंद प्रयागराज (Prayagraj) जिल्ह्यात झाली.
उत्तर प्रदेश सरकारने दिलेल्या माहितीनुसार, प्रयागराजमध्ये सर्वाधिक 14 जणांचा वीज कोसळ्याने मृत्यू झाला. तसेच, कानपूर देहात आणि फतेहपूर येथे प्रत्येकी 5 जणांचा, कौशांबी येथे 4 जणांचा, फिरोजाबादमध्ये 3 जणांचा, उन्नाव हमीरपूर सोनभद्रमध्ये प्रत्येकी 2 जणांचा आणि कानपूर नगर-प्रतापगड-हरदोई-मिर्जापूरमध्ये प्रत्येकी एकाचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला. याशिवाय, 22 जण जखमी झाले असून 200 हून अधिक गुरांचाही मृत्यू झाला आहे. यासंदर्भात, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तत्काळ मदत निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देशही दिले आहेत. उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यात रविवारी रात्रीच्या सुमारास हवामान खराब झाले होते. यामुळे अनेक ठिकाणी पावसासोबतच विजाही कोसळल्या.
तर, राजस्थानात वीज कोसळल्याने जवळपास 20 जणांचा मृत्यू झाला. सरकारी आकडेवारीनुसार, राजस्थानात रविवारी वीज कोसळल्याने मरणारांचा आकडा 20 वर पोहोचला आहे. यांत जयपूर मध्ये 11, धौलपूरमध्ये 3, कोटामध्ये 4, झालावाडमध्ये 1 आणि बारांमध्ये एकाचा मृत्यू झाला.
राजस्थान सरकारकडून मृतांचा कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यांपैकी 4 लाख रुपये आपत्कालीन मदत निधीतून आणि 1 लाख रुपये मुख्यमंत्री मदत निधीतून देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मृतांना श्रद्धांजली देत, त्यांच्या कुटुंबीयांना तत्काल मदत करण्याचे निर्देशही दिले आहेत.