'मुलाची शपथ घेऊन सांगा मतदान केलं होतं; तरच वीज जोडली जाईल', भाजपा आमदाराचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 11:00 AM2021-07-13T11:00:36+5:302021-07-13T11:01:19+5:30
bjp mla veer vikram singh : मुलाची शपथ घेऊन सांगा की भाजपाला मतदान केले होते, तरच वीज जोडली जाईल, असे या व्हिडीओत वीर विक्रम सिंह यांनी म्हटले आहे
लखनऊ : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) शाहजहांपूर (Shahjahanpur) येथील भारतीय जनता पार्टीचे (BJP) आमदार वीर विक्रम सिंह (MLA Veer Vikram Singh) यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मुलाची शपथ घेऊन सांगा की भाजपाला मतदान केले होते, तरच वीज जोडली जाईल, असे या व्हिडीओत वीर विक्रम सिंह यांनी म्हटले आहे.
ग्रामस्थांनी गावात वीज जोडण्याची तक्रार केली. यावर मीरानपूर कटरा भागातील भाजपा आमदार वीर विक्रम सिंह म्हणाले 'तुम्ही तुमच्या मुलांची शपथ घेऊन सांगा की तुम्ही भाजपाला मतदान केले आहे. अपेक्षा ज्याच्याकडून केली जाते, ज्याला काही दिले आहे. जर दिले आहे, तर वीज सुद्धा जोडली जाईल.
व्हिडिओनुसार, भाजपाचे आमदार वीर विक्रम सिंह यांनी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला संबोधित करताना परिसरातील आपल्या विकासकामांचा संदर्भ देत होते. त्यावेळी ग्रामस्थांनी ही वीज जोडणीची तक्रार केली.यावर आमदार वीर विक्रम सिंह म्हणाले, तुम्ही गंगेच्या दिशेने हात करून किंवा आपल्या मुलाची शपथ द्या की तुम्ही आम्हाला मतदान केले आहे, तर आज आम्ही तुमच्या घरी वीज जोडू. अपेक्षा ज्याच्याकडून केली जाते, ज्याला तुम्ही काहीतरी दिले आहे.
याचबरोबर, ज्यावेळी गावकऱ्यांनी आपली तक्रार असल्याचे सांगितले, त्यावेळी आमदार म्हणाले, 'तम्ही ज्याला काही देता, त्याची तक्रार करा. जर तुम्ही दिले असते तर तुम्हाला माझ्या छातीवर चढण्याचा अधिकार आहे. तुम्ही आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करु नका.'
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काय म्हणाले वीर विक्रम सिंह?
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याबाबत आमदार वीर विक्रम सिंह यांनी सांगितले की, गावकरी त्यांच्यावर घरात वीज जोडण्यासाठी दबाव आणत होते. त्या वीजची किंमत 10 लाख रुपये आहे. अशा परिस्थितीत शासनाच्या योजनेंतर्गत ही वीज केवळ सार्वजनिक ठिकाणी जोडली जाते.
दरम्यान, कटरा मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे माजी आमदार राजेश यादव म्हणाले की, निवडणूक जिंकल्यानंतर आमदार सर्वांचा आमदार होतो. कोणाला मतदान केले आणि कोणाला नाही, ही बाब निवडणूक जिंकल्यानंतरच संपते. अशा परिस्थितीत मतदानाचे राजकारण करून शपथ घेणे ही आमदाराला शोभणारी नाही.