पुन्हा हादरलं उत्तर प्रदेश; गँगस्टर अतिक अहमद अन् त्याच्या भावाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 23:40 IST2023-04-15T22:54:46+5:302023-04-15T23:40:21+5:30
या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांची हत्या करण्यात आल्याचे वृत्त आहे.

पुन्हा हादरलं उत्तर प्रदेश; गँगस्टर अतिक अहमद अन् त्याच्या भावाची हत्या
प्रयागराज - उत्तर प्रदेशमध्ये दोन दिवसांपूर्वी उमेश पाल हत्याप्रकरणातील आरोपींचा एन्काऊटर करण्यात आला होता. अतिक अहमदचा मुलगा असद आणि त्याचा साथीदार गुलाम हे दोघेही पोलीस चकमकीत ठार झाले होते. त्यानंतर, आता या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांची हत्या करण्यात आली आहे. एनएनआयने यासंदर्भात माहिती दिली आहे.
झांसीत ज्या दिवशी असदच्या एन्काऊंटरची घटना घडली, त्यादिवशी माफिया अतिक अहमदला प्रयागराज कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच अतिक कोर्टातच ढसाढसा रडला. विशेष म्हणजे आज मुलाच्या दफनविधीसाठीही त्याला येता आले नाही. केवळ जवळच्या नातेवाईकांसह २५ जणांच्या उपस्थितीत असद अहमदचा दफनविधी पार पडला. यावेळी, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यानंतर, काही तासांतच अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद यांचीही हत्या करण्यात आली आहे. प्रयागराज येथे रुग्णालयातून नेत असताना गँगवारच्या हल्ल्यात त्यांना ठार करण्यात आले.
Uttar Pradesh | Visuals from Prayagraj where Mafia-turned-politician Atiq Ahmed and his brother Ashraf Ahmed were shot dead. pic.twitter.com/vyzMk8GEir
— ANI (@ANI) April 15, 2023
दरम्यान, असदच्या सुपूर्द ए-खाक ची रस्म पूर्ण करताना पोलिसांकडून ड्रोनने निगराणी करण्यात आली होती. सकाळी ९.३० वाजता झांसी येथून प्रयागराजला असद व गुलाम यांचे पार्थिव आणण्यात आले होते. त्यानंतर, असदचे शव थेट कसारी-मसारी कब्रस्तानमध्ये नेण्यात आले. तर, गुलामवर मेहदौरी कब्रस्तान येथे दफविधी करण्यात आला. दरम्यान, दोघांच्याही दफनविधीवेळी पल्बीक आणि मीडियाला दूरवरच उभे केले होते. केवळ, जवळच्या २५ नातेवाईकांना कब्रस्तानमध्ये प्रवेश देण्यात आला होता. मुलाच्या दफनविधीसाठीही अतिकला नेण्यात आलं नव्हतं.