उत्तर प्रदेशमध्ये बसपा आणि भाजपाला जोरदार धक्का, सहा आमदार हत्ती तर एक आमदार कमळ सोडून सायकलवर स्वार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 03:53 PM2021-10-30T15:53:44+5:302021-10-30T15:55:02+5:30

Uttar Pradesh Politics News: उत्तर प्रदेशमधील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने BSP आणि BJPला जोरदार धक्का दिला आहे. बसपाच्या सहा आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत Samajwadi Partyमध्ये प्रवेश केला आहे.

In Uttar Pradesh, Six MLA of BSP and One MLA of BJP joined the Samajwadi Party | उत्तर प्रदेशमध्ये बसपा आणि भाजपाला जोरदार धक्का, सहा आमदार हत्ती तर एक आमदार कमळ सोडून सायकलवर स्वार

उत्तर प्रदेशमध्ये बसपा आणि भाजपाला जोरदार धक्का, सहा आमदार हत्ती तर एक आमदार कमळ सोडून सायकलवर स्वार

Next

लखनौ - पुढीलवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागलं आहे. त्यादरम्यान, राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने बसपा आणि भाजपाला जोरदार धक्का दिला आहे. बसपाच्या सहा आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला आहे. तर भाजपाच्या एका आमदाराने समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. या सर्व आमदारांनी अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत समाजवादी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले आहे. यावेळी अखिलेश यादव यांनी सांगितले की, भाजपाविरोधात जनआक्रोष एवढा आहे की, या निवडणुकीत भाजपा भुईसपाट होईल.

अखिलेश यादव यांनी सांगितले की, खूप असे लोक आहेत, जे समाजवादी पक्षात येऊ इच्छित आहेत. येणाऱ्या काळात याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. अखिलेश यांनी सांगितले की, भाजपाने जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, असं आश्वासन भाजपानं दिलं होतं मात्र उत्पन्न कधी दुप्पट होईल, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. आवश्यक सामान आज खूप महाग झाले आहे.

आज बसपामधून सपामध्ये प्रवेश केलेल्या आमदारांमध्ये अस्लम राइनी, अस्लम अली चौधरी, मुज्तबा चौधरी, हाकिम लाल बिंद, हरगोविंद भार्गव, सुष्मा पटेल हे सहा आमदार बसपाचा हत्ती सोडून समाजवादी पक्षाच्या सायकलवर स्वार झाले आहेत. तर भाजपाचे सीतापूरमधील आमदार राकेश राठोड हे समाजवादी पक्षात दाखल झाले आहेत. 

Web Title: In Uttar Pradesh, Six MLA of BSP and One MLA of BJP joined the Samajwadi Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.