सपा आमदारानं बाबासाहेब आंबेडकरांना अशी वाहिली श्रद्धांजली, फोटो पाहून लोक भडकले...!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 07:58 PM2022-04-14T19:58:37+5:302022-04-14T19:59:51+5:30
या फोटोत इरफान सोलंकी बाबासाहेबांच्या खांद्यावर हात ठेवलेल्या स्थितीत दिसत आहेत. विशेष म्हणजे, या फोटोत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गळ्यात फक्त एकच हार आहे, तर सोलंकी यांच्या गळ्यात मोठ्या प्रमाणावर हार दिसत आहेत.
नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहणारे समाजवादी पक्षाचे आमदार इरफान सोलंकी, आता पुन्हा एकदा एका फोटोवरून लोकांच्या निशाण्यावर आले आहेत. त्यांनी आंबेडकर जयंतीनिमित्त एक पोस्ट केली आहे. यात ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी उभे असल्याचे दिसत आहे.
इरफान हे कानपूरच्या सीसामऊ विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी एक फोटो शेअर करत, संविधान निर्माते, भारत रत्न डॉ. भीमराव अंबेडकरजी यांना 131व्या जयंतीनिमित्त शत शत नमन..! #अंबेडकरजयंती, असे लिहिले आहे.
या फोटोत इरफान सोलंकी बाबासाहेबांच्या खांद्यावर हात ठेवलेल्या स्थितीत दिसत आहेत. विशेष म्हणजे, या फोटोत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गळ्यात फक्त एकच हार आहे, तर सोलंकी यांच्या गळ्यात मोठ्या प्रमाणावर हार दिसत आहेत.
संविधान निर्माता,भारत रत्न बाबासाहेब डॉ0 भीमराव अम्बेडकर जी की 131वी जयंती पर शत शत नमन ..! #अंबेडकरजयंतीpic.twitter.com/34SjQmOHnU
— Irfan Solanki (@IrfanSolanki) April 14, 2022
या फोटोवरून सोशल मीडिया युजर्सना इरफान सोलंकीवर भडकले असून त्याना ट्रोल करताना दिसत आहेत. यात एका युजरने लिहिले, बाबासाहेबांची जयंती आहे आणि अधिक हार घालून आमदार स्वतःचीच जयंती साजरी करत आहेत. अद्भुत दृश्य... आणखी एका युजरने लिहिले, फोटो कंफ्यूज करत आहे... नेमकी जयंती कुणाची आहे? आणखी एका युजरने लिहिले, आता जेसीबीसाठी तयार राहा...
तर अनेक युजर्सनी सोलंकी यांची पोस्ट शेअर करत त्यांच्यावर निशाणाही साधला आहे. एका युजरने लिहिले, आपल्या कुणी हार घातले नाही, तर बाबाजींचे काढून स्वतः घातले आणि खांद्यावर हात ठेऊन श्रद्धांजली अर्पण करताना पहिल्यांदाच पाहिलं.
आपको किसी ने माला नही पहनाई तो बाबा जी की उतार के पहन ली, और कंधे पर हाथ रख के श्रद्धांजलि देते हुए पहली बार देखा। 😂😂 https://t.co/USOw8Ppdpb
— रोली निगम 🇮🇳 (@RoliNigam2) April 14, 2022