PM मोदी, CM योगी यांच्या प्रशंसेनं संतापाची आग मस्तकात गेली, ड्रायव्हरनं एकाला गाडीखाली चिरडून मारलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 06:32 PM2023-06-13T18:32:24+5:302023-06-13T18:36:23+5:30

मृत राजेश दुबे हे सोमवारी आपला भाऊ राकेश दुबे यांच्या मुलाच्या लग्नासाठी आरोपीच्या कारने मिर्झापूर येथे जात होते.

Uttar pradesh the praise of pm narendra modi and cm yogi adityanath could not be tolerated the driver crushed the man to death | PM मोदी, CM योगी यांच्या प्रशंसेनं संतापाची आग मस्तकात गेली, ड्रायव्हरनं एकाला गाडीखाली चिरडून मारलं!

PM मोदी, CM योगी यांच्या प्रशंसेनं संतापाची आग मस्तकात गेली, ड्रायव्हरनं एकाला गाडीखाली चिरडून मारलं!

googlenewsNext

उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका गाडीच्या ड्रायव्हरने, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरील टीकेवर आक्षेप घेणाऱ्या एका व्यक्तीला चिरडून मारल्याची घटना घडली आहे. अमजद असे आरोपीचे नाव असून राजेश दुबे (५९) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मृत राजेश दुबे हे सोमवारी आपला भाऊ राकेश दुबे यांच्या मुलाच्या लग्नासाठी आरोपीच्या कारने मिर्झापूर येथे जात होते. यादरम्यान सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. मिर्जापूरचे एसपी संतोष मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधील लोकांमध्ये राजकारणावर बोलत असताना वाद झाला. यामुळे ड्रायव्हर नाराज झाला आणि त्याने पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यावर टीका करायला सुरुवात केली.

यावेळी मृत दुबे यांनी कथितपणे या नेत्यांवरील टीकांचा विरोध केला आणि ड्रायव्ह सोबत त्यांचा जोरदार वाद झाला. काही वेळानंतर, इतर प्रवासी आपापल्या ठिकाणी उतरले आणि कारमध्ये एकटे राजेश दुबेच उरले.

काही वेळानंतर, राजेशही कारमधून उतरून आपल्या घराकडे निघाले. याच वेळी अमजदने कार त्यांच्या अंगावर घातली. यात दुबे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची  माहिती मिळाल्यानंतर, स्थानिकांनी मिर्झापूर-प्रयागराज महामार्गावर निरदर्शन केले. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीवर कारवाईचे आश्वासन देऊन त्यांना शांत केले.

Web Title: Uttar pradesh the praise of pm narendra modi and cm yogi adityanath could not be tolerated the driver crushed the man to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.