आईच्या कुशीत झोपली होती जुळी बाळं, मांजरीनं संधी मिळताच एकाला उचलून नेलं! अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 02:47 PM2023-07-26T14:47:08+5:302023-07-26T14:48:22+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हसनची पत्नी आसमाने 15 दिवसांपूर्वी जुळ्या बाळांना (एक मुलगा एक मुलगी) जन्म दिला होता.
उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्यातील गौतरा पट्टी भौनी गावात एका कुटुंबात जुळ्या बाळांचा जन्म झाला होता. त्यांची आई सोमवारी रात्री त्यांना कुशीत घेऊन झोपली होती. याच वेळी एक रानमांजर घरात शिरली आणि एका बाळाला उचलून घराच्या छतावर घेऊन गेली. यानंतर, हे बाळ छतावरून खाली पडले आणि त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हसनची पत्नी आसमाने 15 दिवसांपूर्वी जुळ्या बाळांना (एक मुलगा एक मुलगी) जन्म दिला होता.
रानमांजर अचानक घरात आली अन्... -
या जुळ्यांच्या जन्मानंतर मुलाचे नाव रिहान आणि मुलीचे नाव अलशिफा ठेवण्यात आले. मुलगा आणि मुलगी सोबत जन्माला आल्याने घरातील वातावरण अत्यंत प्रसन्न होते. मात्र सोमवारी रात्री कुटुंबीयांच्या आनंदाचे रूपांतर शोकात झाले. हसनने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, जुळ्यांच्या जन्मानंतर एक रानमांजर रोज घरात येत होती. मात्र आम्ही तिला हाकलून देत होतो. हसनच्या म्हणण्यानुसार, सोमवारी रात्रीही ही मांजर घरात आली.
आईच्या कुशीत झोपलं होतं बाळं -
रात्री 10 वाजण्याच्या सुमारास एका रानमांजराने आईच्या कुशीत झोपलेल्या रिहानला तोंडात पकडले आणि पळवून नेले. भनक लागताच आईचे डोळे उघडले. तेव्हा एक रानमांजर रिहानला घेऊन जात असल्याचे तिच्या लक्षात आले आणि तिने आरडा ओरड करायला सुरुवात केली. हे ऐकून हसन मांजरीच्या मागे धावला. मात्र तोवर मांजरीने मुलाला गच्चीवरून खाली टाकले होते.
जमिनीवर पडताच बाळाचा जागीच मृत्यू झाला. उसावां पोलीस ठाण्याचे प्रभारी रामेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, जंगली मांजरीने नवजात बाळाला तोंडात दाबून छतावरून खाली टाकले. या घटनेत नवजात बाळाचा मृत्यू झाला. तसेच, नातेवाईकांनी कुठल्याही प्रकारचे तक्रार दिलेले नाही, असेही त्यांनी सांगितले.