उत्तर प्रदेशात उमलणार कमळ, टाइम्स नाऊच्या सर्व्हेत भाजपाला 202 जागा
By admin | Published: January 31, 2017 05:08 PM2017-01-31T17:08:27+5:302017-01-31T17:45:56+5:30
उत्तर प्रदेशमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने आता जोर पकडला आहे. तिकिट वाटपावरून पक्षात असलेली नाराजी
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31 - उत्तर प्रदेशमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने आता जोर पकडला आहे. तिकिट वाटपावरून पक्षात असलेली नाराजी आणि सपा-काँग्रेस आघाडीने समोर उभे केलेले तगडे आव्हानामुळे अडचणींसा सामना करत असलेल्या भारतीय जनता पक्षाला उत्तर प्रदेशातील निवडणुकांबाबत दिलासा देणारी बातमी मिळाली आहे. उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत भाजपा स्वबळावर बहुमत मिळवेल असा अंदाज टाइम्स नाऊ आणि व्हीएमआर यांच्या सर्व्हेत व्यक्त करण्यात आला आहे. या सर्व्हेत भाजपा स्वबळावर 202 जागा जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या सर्व्हेनुसार 403 सभासद असलेल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभेत भाजपाला 34 टक्के मतांसह 202 जागा मिळतील. 2012 साली झालेल्या विधानभा निवडणुकीत भाजपाला अवघ्या 47 जागा मिळाल्या होत्या. त्या तुलनेत हा आकडा कैक पटीने मोठा आहे.
मात्र सध्या उत्तर प्रदेशात सत्ताधारी असलेल्या समाजवादी पार्टीला काँग्रेसशी आघाडी केल्यानंतही फार मोठा लाभ होताना दिसत नाही आहे. सपा आणि काँग्रेसच्या आघाडीला या निवडणुकीत 31 टक्के मतांसह 147 जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. तर उत्तर प्रदेशच्या सत्तेत पुनरागमन करण्यासाठी इच्छुक असलेल्या मायावतींच्या बसपाला केवळ 24 टक्के मतांसह 47 जागा मिळतील असा अंदाज या सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे. अजित सिंग यांच्या लोक दल पक्षाला 7 जागा मिळण्याची शक्यता आहे.